Farmer Viral News esakal
देश

Farmer Viral News : बया, ऐकावं ते नवलंच..! आता शेताची राखण बुजगावणं नाही तर अस्वलं करतात...

शेतात पक्षी, प्राण्यांपासून पिकांचं रक्षण व्हावं म्हणून बुजगावणं उभारलं जातं हे सगळ्यांना माहित आहे.

धनश्री भावसार-बगाडे

Bear Protect Farmers Standing Crops : शेतीचे नांगरणी, पेरणी, कापणी असे अनेक टप्पे असतात. एवढे कष्ट घेऊन पिक उगवल्यावर प्राणी, पक्षी त्याचं नुकसान करतात त्यावेळी शेतकऱ्याच्या सर्व मेहनतीवर पाणी फिरतं आणि त्याच्या हाताला काहीच पिक येत नाही. अशावेळी शेतात एक बुजगावणं उभं करून ठेवण्याची पद्धत फार जूनी आहे जी आजतायगत चालते.

पण हल्लीच्या जगाप्रमाणे हे पक्षी, प्राणीपण फार हुशार झाले आहेत. बुजगावण्यांचा त्यांच्यावर फारसा परिणाम होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उभ्या पिकांच्या रक्षणाची फार चिंता असते.

त्यामुळे आपल्या उभ्या पिकांच्या रक्षणासाठी उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्यांनी शक्कल लढवली आहे. याविषयीची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या इंस्टाग्राम पेजवर ही पोस्ट टाकण्यात आली आहे.

आपल्या उभ्या पिकांचे नुकसान करणाऱ्या प्राण्यांपासून, विशेषत: माकडांपासून संरक्षण करण्यासाठी, उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील काही गावांतील शेतकऱ्यांनी एक जुनी युक्ती स्वीकारली आहे. अस्वलाची वेषभूषा करून 'आक्रमकांना घाबरवण्यासाठी' त्यांच्या शेतात ते फिरू लागले आहेत.

यासाठी शेतकरी 250 रुपये प्रतिदिन या दराने लोकांनाही कामावर घेत आहेत. उदाहरणार्थ, बजरंग गड गावातील संजीव मिश्रा यांनी शाहजहांपूर येथून 5,000 रुपयांना “बेअर ड्रेस” विकत घेतला आहे.

यावर लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट केल्या आहेत. कोणी ही युक्ती चांगली आहे असं म्हटलं आहे तर कोणी चेष्टा मस्करी करत आहे. जर वाघ, किंवा खरा अस्वल आला तर या लोकांचं काय होईल असा प्रश्न उपस्थित करत आहेत. एका म्हटलं आहे की, या सगळ्या खऱ्या प्रश्नाकडे आपण दूर्लक्ष करत आहोत. रोजगाराचा प्रश्न किती भयंकर झाला आहे की, लोकांना पोटाची खळगी भरण्यासाठी असली कामं करण्याची वेळ आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT