farmer esakal
देश

हवामान खात्याविरोधात शेतकरी जाणार कोर्टात; जाणून घ्या कारण?

मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना

Amit Ujagare (अमित उजागरे)

भोपाळ : हवामान खात्याकडून वर्तवण्यात येणारा हवामानाचा अंदाज हा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असतो. हा अंदाज जाहीर झाल्यानंतर शेतकरी आपल्या शेतीविषयक कामांना सुरुवात करतो. पण जर हा अंदाज चुकला तर त्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांना मोठं नुकसानही सोसावं लागतं. अनेकदा अशा बाबी घडताना दिसतात. आता अशाच एका घटनेमुळं मध्य प्रदेशातील काही शेतकऱ्यांनी हवामान खात्याविरोधात कोर्टात जाण्याची तयारी सुरु केली आहे.

मध्य प्रदेशातील मालवा भागातील शेतकरी नेत्यांनी हा पवित्रा घेतला असून हवामान खात्याच्या चुकीच्या अंदाजामुळं या भागातील शेतकऱ्यांना प्रमुख पीक घेताना मोठ्या नुकसानीला सामोर जावं लागल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांनी हवामान खात्याविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्याची तयारी सुरु केली आहे.

शेतकऱ्यांना सहन करावं लागलं मोठं नुकसान

उज्जैनमधील एका शेतकरी नेत्यानं सांगितलं की, शेतकरी कायम हवामान विभागाच्या अंदाजानुसार पेरणी करत असतात. मात्र, हा अंदाज खोटा ठरल्यानं त्यांना मोठं नुकासान सोसावं लागलं आणि त्यांनी पेरलेलं उगवलंच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान खात्यावर विश्वास कसा ठेवायचा? अमेरिका आणि इतर देशांमधील हवामानाचा अंदाज अचूक असतो. त्याचप्रमाणं तिथले शेतकरी शेतीची तयारी करतात. भारतात सरकार हवामान खात्यावर मोठ्याप्रमाणावर खर्च करत आहे मात्र तरीही हवामानाचे अंदाज चुकीचे येत आहेत.

शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला असावा भ्रम - IMD

दरम्यान, हवामान खात्याच्या एका वरिष्ठ वैज्ञानिकानं सांगितलं की, कदाचित शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण झाला असावा. कारण यंदा एका खासगी हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या एजन्सीनं यावर्षी मॉन्सून लवकर दाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता. तर भारतीय हवामान विभागानं (IMD) याउलट अंदाज वर्तवला होता. आएमडीनं असंही म्हटलं होतं की, शेतकऱ्यांनी याकडे लक्ष ठेवायला हवं की, त्यांना मिळत असलेली सूचना खरी आहे किंवा नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT