rail roko. 
देश

Live: देशव्यापी 'रेल रोको'ला उत्स्फुर्त प्रतिसाद; कृषी कायद्यांविरोधातील यल्गार तीव्र

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेले सुमारे तीन महिने दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संयुक्त किसान मोर्चाकडून आज देशव्यापी रेल्वे रोकोचे आवाहन केले आहे. हे आंदोलन शांततामय मार्गानेच व्हावे असे किसान मोर्चाने बजावले आहे. दरम्यान, सिंघू व टीकरी सीमांवरील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची संख्या अतिशय झपाट्याने रोडावत चालल्याने पंजाबमधील किसान महापंचायती बंद करून शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमांवर पुन्हा जमविण्याचेही शेतकरी नेत्यांनी जाहीर केले आहे. 

Updates :

- हरियाणामधील पलवालमध्ये रेलरोको आंदोलन करण्यात आले. 

-  बिहारमध्ये जनअधिकार पार्टी (लोकतांत्रिक)ने रेलरोको आंदोलन केलं. पाटना रेल्वे स्टेशनवर हे आंदोलन करण्यात आले. 

- जम्मू-काश्मीरमध्येही रेलरोको. 

गाझीपूर वगळता दिल्लीच्या दोन्ही सीमांवरील आंदोलनांतील शेतकऱ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. मात्र शेतकरी नेत्यांनी, आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र होईल असा दावा केला आहे. सिंघू व टीकरी येथील आंदोलनाचे तंबू दिसवेंदिवस ओसाड पडत चालल्याचे वृत्त रोज येत आहे. हे आंदोलन अपेक्षेपेक्षा लांबल्याने पंजाब-हरियाणाचे शेतकरी आपापल्या गावांकडे परतू लागले आहेत. पेरणीचा हंगाम येत असल्याने शेतकऱ्यांना आपल्या शेतीकामांची ओढ लागल्याचे एका शेतकरी नेत्याने मान्य केले. मात्र आता पंजाबमधील किसान महापंचायती बंद करण्याचा निर्णय करून दिल्लीतच शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने जमावे असे आवाहन आम्ही गावोगावी जाऊन करमार आहोत असेही एसकेएमतर्फे आज स्पष्ट करण्यात आले. 

संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) आज दुपारी 12 ते 4 या वेळेतील रेल्वे रोको आंदोलन देशात यशस्वी होईल असा विश्‍वास व्यक्त केला. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काल पंजाब, हरियाणासह 4 राज्यांतील पक्षनेत्यांची जी बैठक बोलावली होती त्यातील चर्चेची आम्ही गंभीर दखल घेतल्याचेही शेतकरी नेत्यांनी सांगितले. 

रेल्वेही सज्ज 
रेल्वेने प्रस्तावित रेल रोको आंदोलनात हिंसाचार होऊ नये यासाठी आपल्या बाजूने जय्यत तयारी केली आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या अतिरिक्त 20 कंपन्या म्हणजे 20 हजार जवान संवेदनशील रेल्वे ट्रॅकच्या परिसरांत तैनात करण्यात येणार आहेत. मुख्यतः पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश व पश्‍चिम बंगाल या राज्यांत या जवानांची तैनाती केली जाईल असे आरपीएसएफचे महासंचालक अरूण कुमार यांनी सांगितले. रेल्वेच्या वतीने जिल्हा प्रशासनांबरोबर संपर्क साधून संवेदनशील भागांत नियंत्रण कक्ष बनविण्यात येतील. रेल्वे रोको आंदोलनामुले सर्वसामान्य प्रवाशांना त्रास होऊ नये व आंदोलन सांततापूर्ण मार्गानेच पूर्ण व्हावे यासाठी रेल्वेने पूर्ण सज्जता ठेवल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT