narendra modi with mother. 
देश

'संपूर्ण देश तुम्हाला धन्यवाद देईल'; शेतकऱ्याचे PM मोदींच्या आईला भावुक पत्र

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- दिल्लीच्या सीमेवर आंदोलन (Farmers Protest) करणाऱ्या एका शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची वृद्ध आई हीराबेन मोदी (Heeraben Modi) यांना एक भावुक पत्र लिहिलं आहे. हिराबेन यांनी आपल्या मुलाला तिन्ही कृषी कायदे  (New Farm Laws) रद्द करण्यास सांगावं, ज्यामुळे देशात मोठं शेतकऱ्यांचे आंदोलन होत आहे. पंतप्रधान मोदी यांचे मन बदलण्यासाठी एक आई म्हणून त्या सर्व शक्ती वापरतील, अशी आशा शेतकऱ्याने पत्रात व्यक्त केली आहे. 

Corona Update : राज्यात 2,752 नवे रुग्ण; गेल्या 24 तासांत देशात 131 रुग्णांचा...

पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील गोलू का मोढचे रहिवाशी हरप्रीत सिंह यांनी हिंदीमध्ये पत्र लिहिलं आहे. त्यांनी जवळजवळ 100 वर्षाच्या हिराबेन यांना आवाहन करत भावुक शब्दांचा वापर केला आहे. शेतकरी प्रतिकुल परिस्थितीत करत असलेले आंदोलन, कृषी कायदे रद्द करण्याची लोकप्रिय मागणी, देशाची भूक भागवण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान अशा अनेक मुद्द्यांचा त्यांनी पत्रामध्ये उल्लेख केला आहे. 

मी मोठ्या जड मनाने तुम्हाला हे पत्र लिहित आहे. तुम्हाला माहिती आहे की देशाचा अन्नदाता नव्या तीन कृषी कायद्यांविरोधात थंडीच्या परिस्थितीत दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहे. यात 90 ते 95 वर्षांच्या वयस्कर लोकांचा आणि लहान मुले, महिलांचा समावेश आहे. कडाक्याच्या थंडीमुळे शेतकरी आजारी पडत आहेत. ऐवढेच नाही तर लोक शहीद होत आहेत, त्यामुळे आपल्या सर्वांसाठी हा चिंतेचा विषय आहे, असं हरप्रीत सिंह म्हणाले आहेत. 

हरप्रीत पुढे म्हणात की, दिल्लीच्या सीमेवर तीन काळ्या कायद्यांच्या विरोधात आंदोलन होत आहे. हे कायदे अडानी, अंबानी आणि अन्य कॉर्पोरेट घराण्यांच्या इशाऱ्यावर बनवण्यात आला आहे. कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 61 वा दिवस आहे. या आंदोलनात हरप्रीत सिंहही सहभागी झाले आहेत.

अर्णब गोस्वामींनी TRP साठी 40 लाख आणि सहलीसाठी 12 हजार डॉलर दिले, बार्कच्या...

दरम्यान, शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेच्या 11 फेऱ्या पार पडून देखील अद्याप कोणताही तोडगा निघाला नाहीये. तर एकीकडे शेतकरी येत्या प्रजासत्ताक दिनाला 'किसान गणतंत्र परेड' अशी ट्रॅक्टर रॅली काढून आपल्या मागण्या पुढे रेटायचा प्रयत्न करण्यासाठी एकप्रकारे शक्तीप्रदर्शन करत आहेत. या ट्रॅक्टर परेडला परवानगी नाकारण्यासाठी केंद्र सरकार हरतर्हेचे प्रयत्न करत होते. सरकार परवानगी देवो अगर न देवो, आम्ही ही परेड काढूच, असा शेतकऱ्यांचा निर्धार होता. मात्र, सरतेशेवटी दिल्ली पोलिसांना या परेडसाठी परवानगी द्यावी लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT