priyanka gandhi 
देश

'मोदीजी, आपल्याच शेतकऱ्यांशी युद्ध?' प्रियंका गांधींची पंतप्रधानांवर टीका

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या 68 दिवसांपासून दिल्ली सीमेवर आंदोलन सुरु आहे. प्रजासत्ताक दिनी झालेल्या धुमश्चक्रीनंतर शेतकऱ्यांनी आता पुन्हा सरकारला नमवण्यासाठी कंबर कसली आहे. दुसरीकडे सरकार हरतर्हेने शेतकऱ्यांचे हे आंदोलन चिरडून टाकण्याच्या प्रयत्नात आहे. आंदोलन स्थळी इंटरनेट, वीज-पाण्याची सुविधा बंद केली गेली आहे. तसेच जाण्यायेण्याचे मार्ग देखील रस्त्यात टोकदार मोठे खिळे ठोकून बंद केले गेले आहेत. मजबूत असं बॅरिकेडींग केलं गेलं आहे. यावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यानी टीका केली आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी देखील सरकारला धारेवर धरलं आहे. 

प्रियंका गांधी यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सरकारने उभं केलेल्या बॅरिकेडींगची दृश्ये आहेत. यामध्ये स्पष्ट  दिसतंय की, जवळपास चार  पदरी भलंमोठं बॅरिकेडींग सरकारद्वारे उभं करण्यात आलं आहे. यामध्ये भींती लोखंडी बॅरिकेड्स तसेच मोठे टोकदार खिळे लावण्यात आले आहेत. जेणेकरुन शेतकऱ्यांना दुसऱ्या बाजूला जाताच येऊ नये. या बॅरिकेडींच्या पलीकडे पोलिसांचा मोठा फौजफाटा सुसज्जरित्या तैनात आहे. हे दृश्य असं आहे की जणू काही सरकारचं शेतकऱ्यांविरुद्ध युद्धच सुरु आहे. याच आशयाचं ट्विट प्रियंका गांधी यांनी केलं आहे.

हा व्हिडीओ ट्विट करुन त्यांनी म्हटलंय की, प्रधानमंत्री जी, अपने किसानों से ही युद्ध? पंतप्रधानजी, आपल्याच शेतकऱ्यांशी युद्ध? पोलिसांनी गाझीपूर, सिंघू आणि टिकरी बॉर्डरवर बॅरिकेड्सच्या मोठ्या भींती उभारून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. तर दुसरीकडे आपल्या ट्विटर हँडलवर राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पोलिसांनी तयार केलेलं भलंमोठं तगडं असं बॅरिकेडींग तसेच टोकदार खिळे दिसून येत आहेत. या फोटोंना शेअर करत राहुल गांधी यांनी म्हटलंय की, भारत सरकार, पुलांची निर्मिती करा, भींती बांधू नका. 

दुसरीकडे शेतकऱ्यांनी देखील आपलं आंदोलन तीव्र करण्यासाठी पावलं उचलली आहेत. येत्या 6 फेब्रुवारी रोजी देशभरात तीन तासांसाठी चक्का जाम करण्याचे आंदोलन शेतकऱ्यांनी जाहीर केलं आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT