shatrughan_Sinha. 
देश

काँग्रेसचे भविष्य उज्वल, शेतकरी आंदोलनातून धडा घ्यावा- शत्रुघ्न सिन्हा

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- शेतकरी आंदोलनामुळे (Farmers Protests) देशाच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण झाले आहे. पंजाब, हरियाणासह अनेक राज्याचे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. शेतकऱ्यांना दिल्लीच्या जंतर-मंतरवर प्रदर्शन करु दिले जात नाहीये. काँग्रेस नेता आणि माजी खासदार शत्रुघ्न सिन्हा  (Shatrughna Sinha) यांनी शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं. केंद्र सरकार शेतकऱ्यांना देत असलेली वागणूक दुखदायी आहे, असं ते म्हणाले आहेत. काँग्रेस या शेतकरी आंदोलनापासून काही धडा घेऊन मजबूतीने पुन्हा उभी राहिल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. ते 'एनडीटीव्ही'शी बोलत होते. 

शेतकऱ्यांचा मुद्दा मी एक संवदेनशील कलाकार आणि व्यक्ती म्हणून पाहतो. त्यांच्यासोबत जे होत आहे, ते दुखद आहे. एक म्हण आहे की  'nip the bud in the beginning', तसंच होताना दिसत आहे. सर्वांना माहिती आहे की कृषी कायदे कोणत्या पद्धतीने आणण्यात आले आहेत. ज्या पद्धतीने संसदेत हा कायदा आणण्यात आला किंवा मंजूर करुन घेण्यात आला, त्यामुळे लोकांमध्ये आता विश्वास राहिलेला नाही. मी पूर्ण खात्रीने सांगतो की सरकार आणि भाजप नेत्यांनी आपला विश्वास गमावला आहे. कोणतेही वचन असो किंवा घोषणा असो, सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरली आहे. मी शेतकऱ्यांनी दाखवलेली एकजूटता आणि अनुशासन याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो, असं सिन्हा म्हणाले आहेत. 

अमेरिकेतून गायब झालेला रहस्यमयी खांब दिसला यूरोपात; लोकांमध्ये गोंधळ

काँग्रेसला राहुल गांधी यांच्या पुढे जाऊन पाहिलं पाहिजे का? असा प्रश्न सिन्हा यांना विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले की, ''मला अजूनही काँग्रेसचे भविष्य उज्वल वाटते. काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल यांचे निधन झालं, मला चिंता आहे की त्यांची उणीव भासेल. पक्षाचे दोष दूर करण्यासाठी आम्ही चिंतन करत आहोत. मला वाटतं की देशातील अनेक अडथळ्यानंतरही काँग्रेसच पर्याय ठरु शकते. काँग्रेस आपली समीक्षा करुन शेतकरी आंदोलनातून धडा घेईल आणि पुन्हा मजबुतीने उभी राहिल'' 

दरम्यान, गेल्या 6 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. सरकारने नव्याने आणलेले तीन कृषी कायदे मागे घ्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. याच संदर्भात कृषीमंत्री आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये मंगळवारी बैठक पार पडली. चर्चा निष्फळ ठरल्याने 3 डिसेंबर रोजी पुन्हा बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT