farmers reached red fort 
देश

Tractor Parade Live : गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 62 वा दिवस. तर आज भारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन! यानिमित्ताने शेतकऱ्यांकडून आज 'किसान गणतंत्र परेड' काढण्यात येणार आहे. लाखो शेतकरी ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून कृषी कायद्यांना विरोध करणारी आपली मागणी पुढे रेटत आहेत. या ट्रॅक्टर रॅलीमध्ये हजारो शेतकरी सिंघु, टीकरी आणि गाजीपूर बॉर्डरवर जमले आहेत. जिथे पहावं तिथे शेतकऱ्यांचे तिरंग्यानी सजलेले ट्रॅक्टर पहायला मिळत आहेत. या ट्रॅक्टर रॅलीच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली गेली होती. त्यामुळे कडोकोट सुरक्षा केली गेली आहे. या  परेडचे लाईव्ह अपडेट्स...

Updates :

- शेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणानंतर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी उच्च स्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी गृहसचिव, दिल्ली पोलिस आयुक्तही उपस्थित आहेत. 

- प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीत सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे आम्ही आभार मानतो. तसेच, आज घडलेल्या अनपेक्षित आणि अस्विकारार्ह घटनांबद्दल आम्ही खेद आणि निषेध व्यक्त करतो. याप्रकारच्या कृत्यांचे अजिबात समर्थन न करत आम्ही या घटनांचा निषेधच करतो. - संयुक्त किसान मोर्चा

- कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी दिल्ली-एनसीआरच्या काही भागातील इंटरनेटची सुविधा बंद करण्यात आली आहे. 

- एका आंदोलकाने लाल किल्ल्यावरील एका घुमटावर चढून तिथे झेंडा लावला आहे. 

- शेतकरी नेत्यांच्या हातातून आंदोलकांवरील नियंत्रण सुटले आहे का? या प्रश्नावर भारतीय किसान युनियनचे प्रवक्ता राकेश टिकैत यांनी म्हटलंय की, ज्या लोकांनी हिंसा केली त्यांची ओळख आम्ही पटवली आहे. ते राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत, जे या आंदोलनाला गालबोट लावू इच्छित आहेत. 

- पुढील आंदोलन शांततेत करु - राकेश टिकैत, प्रवक्ता, भारतीय किसान युनियन

- लाल किल्ल्यावर शेतकऱ्यांनी फडकवला आंदोलनाचा झेंडा

-आंदोलन शेतकरी लाल किल्ल्यावर पोहोचले असून तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे.

- लाल किल्ल्यावर शेतकरी आंदोलक पोहोचले.

- आयटीओ परिसरात आंदोलकांकडून डीटीसी बसची तोडफोड.

- आंदोलकांकडून हिंसक वर्तन आणि पोलिसांवर हल्ला केला गेला आहे. पोलिसांकडूनही लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर सुरु आहे. ट्रॅक्टर परेडला हिंसक संघर्षाचे गालबोट लागले आहे.

- शेतकऱ्यांना मार्ग बदलला. पोलिस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष आणि गोंधळ सुरु आहे.

- शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने कूच केली आहे. बऱ्याच ठिकाणी गोंधळाची परिस्थिती आहे. ट्रॅक्टर्समुळे रस्ते जाम झाले आहेत. मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न होत आहेत. याला रोखण्यासाठी पोलिस लाठीचार आणि अश्रुधुराचा वापर करत आहेत.

- आऊटर रिंगरोडच्या दिशेने शेतकरी रवाना. गाजीपूरमध्येही अश्रुधुराचा वापर

पोलिसांच्या गाडीवर आंदोलक चढलेले दिसून आले आहेत. मुकरबा चौकात शेतकरी बॅरिकेड्स काढताना दिसत आहेत.

VIDEO : जे शेतकरी दिल्लीतील सिंघू बॉर्डरवरील संजय गांधी ट्रान्सपोर्ट नगरवर पोहोचले आहेत, त्यांच्यावर पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला आहे. 

- आम्ही रिंगरोडच्या दिशेने जात आहोत. मात्र पोलिस आम्हाला अडवत आहेत. आम्ही त्यांना त्यांच्या वरिष्ठांशी बोलण्यासाठी 45 मिनिट दिले आहेत. आम्ही शांततेने परेड काढत आहोत. ते ज्या मार्गावरुन आम्हाला जायला सांगत आहेत, तो आधी ठरवलेला निर्धारित मार्ग नाहीये. पोलिस आम्हाला अडवत आहेत. असं किसान मजदूर संघर्ष कमिटीचे सतनाम सिंग पन्नू यांनी म्हटलं आहे. 

- सिंघू बॉर्डरव पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष सुरु आहे. मुबारका चौकात पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे. 

- दिल्लीतील मुकरबा चौकात गोंधळ सुरु आहे. पोलिसांनी लाठीचारासह अश्रुधुराचा वापर केला आहे. 

- नोएडा सीमेवर शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडले. पोलिसांनी अश्रुधुराचा केला वापर

- सिंघू बॉर्डरवरील ट्रॅक्टर रॅली दिल्लीतील संजय गंधी ट्रान्सपोर्ट नगरपर्यंत पोहोचली आहे. ही रॅली पुढे डीटीयू-शाहबाद-एसबी डेअरी-दारवाला-बावना टी पॉइंट-कांजवाला चौक-खारखोडा टोल प्लाझा मार्गे जाणार आहे.

- टिकरी बॉर्डरवरुन ट्रॅक्टर रॅलीने दिल्लीत प्रवेश केला आहे. 

- आंदोलक शेतकऱ्यांनी दिल्ली-हरयाणाच्या टिकरी बॉर्डरवरचे पोलिस बॅरिकेडींग तोडले आहेत. सिंघू बॉर्डरवरील बॅरिकेड्स तोडून शेतकरी ट्रॅक्टरवरुन पुढे सरसावत आहेत.

दरम्यान कृषीमंत्री  नरेंद्र सिंह तोमर यांनी या परेडच्या आयोजनावर टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की, शेतकऱ्यांना 26 जानेवारी ऐवजी इतर कोणत्याही दिवसाची निवड केली असती, परंतु त्यांनी हाच दिवस निवडला. शेतकर्‍यांची ही रॅली शांततेत पार पडेल, याची काळजी त्यांनी घ्यायला हवी. कारण पोलिस प्रशासनासाठी देखील चिंताजनक बाब आहे.

ट्रॅक्टर परेडमध्ये 2 लाख ट्रॅक्टर होणार सामील 
तीन नव्या कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकरी संघटनांनी म्हटलं की त्यांची परेड दिल्लीत प्रवेश करणार नाही. तसेच प्रजासत्ताक दिनाची मुख्य परेड पार पडल्याशिवाय शेतकऱ्यांची परेड सुरु होणार नाही, अशी स्पष्टता आंदोलकांकडून देण्यात आली आहे. त्यांच्या या ट्रॅक्टर परेडमध्ये जवळपास दोन लाख ट्रॅक्टर सहभागी होणार असल्याची माहिती आहे. ही  परेड सिंघु बॉर्डर, टिकरी आणि गाजीपुर मार्गे जाईल.

करनाल बायपासवर उभारली भिंत
या ट्रॅक्टर रॅलीच्या पार्श्वभूमीवर करनाल बायपासवर एक तात्पुरती भिंत उभी केली आहे. या गाड्यांना राजधानी प्रवेश दिला जाणार नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT