Fastag Annual Plan Scheme : राष्ट्रीय महामार्गांवरील टोल शुल्कासंदर्भात सध्या वाहनचालकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. खास करून फास्टॅगच्या ‘वार्षिक पास योजने’बाबत अनेक गैरसमज, अफवा आणि अर्धवट माहिती पसरत आहे. यामुळेच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी थेट व्हिडिओद्वारे लोकांना मार्गदर्शन करत सर्व शंका दूर केल्या आहेत.
या व्हिडिओमध्ये गडकरींनी स्पष्ट केले की फास्टॅगची वार्षिक योजना नक्की आहे तरी काय, कोणत्या वाहनांसाठी ती लागू आहे, कुठे ती वापरता येते आणि योजनेचा प्रत्यक्ष फायदा कोणाला होतो.
या योजनेअंतर्गत वाहनधारकाला वर्षभरासाठी २०० ट्रिप्सचा एक टोकन पॅकेज दिला जातो.
यासाठी सुमारे 3000 रुपये इतका खर्च येतो.
प्रत्येक ट्रिप म्हणजे तुम्ही एक टोल प्लाझा ओलांडला, की एक ट्रिप वजा होईल.
उदाहरणार्थ, जर एखाद्या दिवशी तुम्ही १० टोल नाके पार केले, तर तुमच्याकडून १० ट्रिप्स वजा केल्या जातील.
ही योजना केवळ खाजगी कार, जीप, आणि व्हॅनसाठी उपलब्ध आहे.
योजनेंतर्गत लाभ फक्त राष्ट्रीय महामार्गांवर आणि ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)’च्या अधिपत्याखालील एक्सप्रेसवेवरच लागू होतो.
त्यामुळे तुम्ही जर राज्य महामार्गांवर किंवा राज्य सरकारच्या ताब्यातील टोल रस्त्यांवर प्रवास करत असाल, तर तुम्हाला या योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही.
यमुना एक्सप्रेसवे (नोएडा ते आग्रा) हा YEIDA च्या अधिपत्याखाली आहे त्यामुळे येथे फास्टॅग वार्षिक योजनेचा उपयोग करता येणार नाही.
मात्र, दिल्ली-जयपूर राष्ट्रीय महामार्ग, पुणे-बेंगळुरू एक्सप्रेसवे, अशा NHAIच्या ताब्यातील मार्गांवर ही योजना पूर्णतः लागू आहे.
राजमार्ग यात्रा मोबाईल अॅप वापरून तुम्ही ही योजना सक्रिय करू शकता.
तसेच NHAI किंवा MORTH (केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय) च्या वेबसाइटवर लवकरच एक लिंक दिली जाणार आहे.
योजनेचे नूतनीकरणही सोप्या पद्धतीने अॅप किंवा वेबसाइटवरून करता येईल.
वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी खर्चात बचत.
टोल प्लाझाजवळ राहणाऱ्यांसाठी मोठा फायदा.
टोल नाक्यांवरील गर्दी कमी होईल, त्यामुळे वाहतूक सुरळीत होईल.
डिजिटल प्रणालीमुळे पारदर्शकता वाढेल आणि नकली तिकिटांचे प्रमाण कमी होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.