father and son died in road accident at uttar pradesh father and son died in road accident at uttar pradesh
देश

औषध घेण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्रांवर काळाचा घाला; ४ जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

भरधाव कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या टॅंकरला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू (died) झाला. तर दोन जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. हा भीषण अपघात उत्तर प्रदेशातील कानपूर देहाट जिल्ह्यातील अकबरपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर घडला. अपघातातील मृत औरैया जिल्ह्यातील विविध भागातील रहिवासी होते. ते कानपूरला औषध घेण्यासाठी जात होते. (father and son died in road accident)

प्राप्त माहितीनुसार, बुधवारी राष्ट्रीय महामार्गावर कानपूर ग्रामीण भागातील अकबरपूर पोलिस ठाण्याच्या शहजादपूर गावाजवळ औरैयाहून कानपूरच्या दिशेने येणाऱ्या कारने मागून पाण्याच्या टँकरला धडक दिली. या भीषण अपघातात अरविंद माधव (५६), चालक अझहर अली (२५), मयंक पोरवाल (२९) आणि राजू पोरवाल (५५) यांचा मृत्यू (died) झाला. मयंक आणि राजू पोरवाल हे पिता-पुत्र आहेत.

अपघातानंतर जखमींनी आरडाओरडा केल्याने रस्त्यावरून जाणाऱ्यांसह परिसरातील नागरिकांची गर्दी झाली. यानंतर अकबरपूर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अकबरपूरचे एसडीएम बागीश शुक्ला पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी गाडीत अडकलेल्यांना बाहेर काढले.

मात्र, तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. दोन जणांना गंभीर अवस्थेत गाडीतून बाहेर काढण्यात आले. त्यांना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात नेले असता एकाचा वाटेतच मृत्यू (road accident) झाला. तर चौथ्या जखमी तरुणाचा रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी अपघातग्रस्त कार महामार्गावरून हटवून वाहतूक सुरळीत करून मृतांची ओळख पटवली. अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना माहिती देऊन कारवाई करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT