father and son travels 105 km cycle attending exam at mp photo viral 
देश

'बाप' नावाचा माणूस सोशल मीडियावर व्हायरल...

वृत्तसंस्था

मांडू (मध्य प्रदेश): एका व्यक्तीने आपल्या मुलाला परिक्षेच्या ठिकाणी पोहचविण्यासाठी सायकलवरून बसवून तब्बल 105 किलोमीटरचे अंतर पार केले. दोघांचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून, वडिलांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेले छायाचित्र पाहिल्यानंतर वडिलांची हिंमत आणि जिद्दीची कल्पना येते. मुलाला दहावीच्या परिक्षा देता यावी यासाठी वडिलांनी १०५ किलोमीटरचे अंतर सायकलने पार केले आहे. सायकलवर मुलासह खाण्याच्या वस्तूही आहेत. एवढे वजन घेऊन त्यांनी मोठा टप्पा पार केला.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशात दहावी आणि बारावीच्या परिशक्षेत अयशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परिक्षेची संधी दिली जाते. बयडीपुर येथील आशिष दहवीच्या परिक्षेत तीन विषयांमध्ये अयशस्वी झाला होता. त्यामुळे त्याला पुन्हा परिक्षा द्यायची होती. पण, लॉकडाऊनमुळे वाहने बंद आहेत. गावापासून परिक्षेचे ठिकाणी 105 किलोमीटर अंतरावर आहे. यामुळे आशिषचे वडील शोभाराम यांनी सायकलवरून प्रवास करण्याचे ठरवले. सोमवारी (ता. 17) रात्री १२ वाजता शोभाराम आपल्या मुलासह निघाले. तब्बल ७ तास सायकल चालवून ते धार येथे पोहचले. त्यानंतर मंगळवारी सकाळी ८ वाजता पेपरची वेळ सुरू होणार होती. परिक्षा सुरू होण्याच्या १५ मिनिटे आधी हे दोघे परिक्षाकेंद्रावर पोहोचले. बुधवारी आणि गुरवारी पुढील पेपर असल्यामुळे दोघेही परिक्षाकेंद्राजवळ राहाणार आहेत.

मजुरीचे काम करत असलेले शोभाराम यांनी सांगितले की, 'परिस्थितीमुळे मी शिक्षण घेऊ शकलो नाही. पण, मुलाला शिकवून खूप मोठे बनवायचे आहे. गावातून 500 रुपये उसने घेऊन परिक्षेच्या ठिकाणी दाखल झालो आहोत.' दरम्यान, शोभाराम यांचा मुलासह सायकलवरील छायाचित्र व्हायरल होत असून, त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT