ओमिक्रॉन व्हेरिएंट सावध  sakal
देश

‘ओमिक्रॉन’ची धास्ती वाढली

दिल्लीत ख्रिसमस, नववर्ष कार्यक्रमावर बंदी

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या ओमिक्रॉन या व्हेरिएंटच्या (Omicron variant)संसर्गाचा धोका बळावत असल्याने यंत्रणा सावध झाली असून देशातील एकूण बाधितांची संख्या २१३ वर पोचली आहे, महाराष्ट्र आणि दिल्लीत संसर्गाचा धोका वाढला आहे. राजधानी दिल्लीत ख्रिसमस आणि नववर्षाच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली असून अन्य राज्ये देखील तोच कित्ता गिरविण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उद्या (ता.२३) देशभरातील परिस्थितीचा आढावा घेऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. उत्तरप्रदेशात माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी डिम्पल यादव आणि मुलीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले असून अखिलेश यांनीही स्वतःला विलगीकरणात ठेवले आहे. डिम्पल आणि त्यांच्या मुलीवर सध्या घरीच उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राजस्थानमध्ये देखील आज ओमिक्रॉनचे चार नवे रुग्ण आढळून आल्याने प्रशासन सावध झाले आहे. दुसरीकडे वाढता संसर्ग रोखण्यासाठी बूस्टर डोसबाबत केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली असून सरकारने मात्र सखोल संशोधनानंतर त्याबाबत निर्णय घेतला जाईल असे म्हटले आहे. याआधीही अशीच मागणी करण्यात आली होती.

ऑक्सिजन व्यवस्थापनावर भर

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून धडा घेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ऑक्सिजनच्या प्रभावी आणि योग्य वापरावर भर दिला आहे. आता देशभरातील आरोग्य कर्मचाऱ्यांना ऑक्सिजनच्या वापराचे धडे दिले जाणार असून उपलब्ध साठ्याचा योग्य वापर करण्याबरोबरच थोडाही ऑक्सिजन वाया जाऊ नये म्हणून खबरदारी घेण्याचे निर्देश या कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. राष्ट्रीय ऑक्सिजन परिचारक कार्यक्रमाला आज ‘एम्स’मधून सुरूवात करण्यात आली. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार उपस्थित होत्या. कोरोना आणीबाणीच्या काळामध्ये ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली होती त्यामुळे त्याचा सुयोग्य वापर होणे गरजेचे आहे, असे पवार म्हणाल्या.

देशातील मोठी लोकसंख्या कोरोना लशीपासून अद्याप वंचित असून डिसेंबर अखेरपर्यंत केवळ ४२ टक्के लोकांचेच लसीकरण होऊ शकेल. आपल्याला संसर्गाची तिसरी लाट रोखायची असेल तर साठ टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे. केंद्र सरकार बूस्टर डोसचा कधी विचार करणार आहे.

- राहुल गांधी, नेते काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा, हातात फक्त तिरंगा!

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जाम! टेम्पो पलटी झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा, 4-5 तासांपासून भीषण कोंडी

Revanth Reddy Remarks : ‘महादेव गरिबांचे, राम श्रीमंतांचे’ रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले; भाजप आक्रमक

Marathi News Live Updates: अंगारकी चतुर्थीनिमित्त मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी, मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण

World Heart Day 2026: कार्डिओफोबिया म्हणजे काय? लक्षणे, कारणे आणि उपचार याबद्दल संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर!

SCROLL FOR NEXT