D Y Chandrachud esakal
देश

वरिष्ठाने लैंगिक शोषण केल्याचा महिला न्यायाधीशांचा आरोप; चंद्रचूड यांना पत्र, इच्छामरणाची मागणी

उत्तर प्रदेशातल्या एका महिला न्यायाधीशाने थेट सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र लिहून इच्छामरणाची मागणी केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Femal Judge alleges sexual harassment : उत्तर प्रदेशातल्या एका महिला न्यायाधीशाने थेट सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र लिहून इच्छामरणाची मागणी केली आहे. पीडित महिला जज यांनी वरिष्ठ न्यायिक अधिकाऱ्यावर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. हे पत्र गुरुवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं मीडिया रिपोर्टनुसार सांगितलं जात आहे.

'लाईव्ह हिंदुस्थान'ने इंडियन एक्स्प्रेसच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे की, पीडित महिला न्यायाधीशाने अत्यंत निराशेच्या गर्तेत जात हे पत्र लिहिलं आहे. पत्रामध्ये त्या म्हणतात, माझा लैंगिक छळ केला गेला आहे. मला अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक देण्यात आली. त्यामुळे मी स्वतःला सावरु शकत नाहीये. मला आणि माझ्यासोबत त्रास झालेल्या इतरांना न्याय मिळेल, अशी आशा आहे.

पीडित न्यायाधीश पत्रामध्ये पुढे म्हणतात, मी हे पत्र अत्यंत खेदाने आणि नैराश्येत लिहित आहे. या पत्रातून मला केवळ माझ्या वेदना आणि माझ्या मागण्या मांडायच्या आहेत, त्यापलीकडे माझा काहीही उद्देश नाही. त्यामुळे सरन्यायाधीशांनी मला माझं जीवन संपवण्याची परवानगी द्यावी.

''मी मोठ्या उत्साहाने या क्षेत्रात आले होते''

पीडित महिला न्यायाधीश पढे लिहितात, मी मोठ्या उत्साहाने आणि विश्वासाने न्यायिक सेवेत सहभागी झाले होते. सामान्यांना न्याय देता येईल, या भावना माझ्या होत्या. परंतु मला माहिती नव्हतं की, न्यायासाठी मलाच याचना कराव्या लागतील.

सहा महिन्यांपूर्वी मागच्या पोस्टिंगमध्ये आपल्यावर लैंगिक अत्याचार झाले, असा आरोप महिलेने केला आहे. ''आपल्या प्रकरणात निष्पक्ष तपास होईल, अशी शक्यता मला वाटत नाही. आपल्याला आपल्या वरिष्ठाने रात्री भेटावयास बोलावले होते, त्यानंतर आपण आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला परंतु तो यशस्वी झाला नाही.''

पत्रामध्ये पीडिता लिहितात, आता मला जगण्याची अजिबात इच्छा नाहीये. मागच्या दीड वर्षांमध्ये माझी अवस्था जिवंत प्रेतासारखी झालेली आहे, माझ्या आयुष्याचा आता काहीही उद्देश उरला नाही. त्यामुळे माझं आयुष्य मला सन्मानाने संपवण्याची परवागी द्यावी, अशी मागणी त्यांनी पत्रामधून केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT