IPL_Mohoba Jail 
देश

आयपीएलच्या सामन्यावरुन तुरुंगात राडा; एका कैद्यानं दुसऱ्याचा फोडला डोळा!

आयपीएलच्या सामन्यांवरुन चाहत्यांमध्ये राडे झाल्याचं आपण पाहिलं असेल पण तुरुंगातील कैद्यांमध्ये यावरुन तुफान हाणामारी होणं दुर्मिळचं.

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ : आयपीएलच्या १५ व्या हंगामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. आयपीएलच्या नादखुळ्या चाहत्यांचा अंदाजच वेगळा असतो. यातील विविध टीमच्या पाठिराख्यांची प्रत्येक सामन्यादरम्यान सुरु असलेली रस्सीखेचही वेगळीच, असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील तुरुंगात घडला आहे. इथं आयपीएलच्या सामन्यावरुन चक्क दोन कैद्यांमध्ये जुंपली आणि जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत चक्क एका कैद्यानं दुसऱ्याचा डोळाच फोडला. यूपीतील महोबा जिल्हा कारागृहात हा प्रकार घडला. (fight broke out in Mohoba UP jail over IPL match One prisoner got eye injury)

महोबा तुरुंगाचे तुरुंगाधिकाऱ्यांनी सांगितलं की, टीव्हीवर आयपीएलचा सामना पाहण्यावरुन बॅरॅकमधील दोन कैद्यांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये वर्षभरापासून तुरुंगात शिक्षा भोगत असलेला चोरीचा आरोपी दीपक याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. या कैद्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दुसरा आरोपी कैदी जयचंद हा सुरक्षित आहे.

तुरुंगातील सुरक्षा रक्षक भोलानाथ मिश्रा यांनी सांगितलं की, तुरुंगातील कैद्यांना मनोरंजनासाठी एक टीव्ही बसवण्यात आला आहे. या टीव्हीवर सर्व कैदी आयपीएलचे सामने बघत असतात. हा सामना सुरु असताना दीपक आणि जयचंद या दोघांमध्ये वाद झाला. पाहता पाहता दोघेही हाणामारीवर उतरले. याची माहिती एका कॉन्स्टेबलने तुरुंगाधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर दोघांमधील भांडण सोडवण्यात आलं. पण या हाणामारीत दीपकच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. तर दुसऱ्या कैद्यावर तुरुंगातच उपचार केले जात आहेत.

दरम्यान, महोबा तुरुंगातील रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या दीपकची स्थिती स्थिर असून येणाऱ्या काळात अशा प्रकारचा वाद निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर गस्त वाढवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT