लखनौ - उत्तर प्रदेशचे माजी प्रशासकीय अधिकारी सूर्यप्रताप सिंह यांनी कोरोना चाचणी संबंधी एक ट्विट केलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. ट्विटमध्ये सूर्यप्रताप सिंह यांनी उत्तर प्रदेश करत असलेल्या कोरोना चाचणी प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले होते. उत्तर प्रदेशचे उच्च अधिकारी जिल्हा भागातील अधिकाऱ्यांना कोविड-19 चाचणीची गती कमी करण्यास सांगत आहेत, असा आरोप त्यांनी केला होता.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
लखनौच्या हजरतगंज पोलिस स्टेशनमध्ये गुरुवारी सूर्यप्रताप सिंह यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सिंह यांनी 10 जून रोजी एक ट्विट केलं होतं. यात ते म्हणाले होते की, "मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या टीम-11 च्या बैठकीत मुख्य सचिव कोरोना चाचणी करणाऱ्या काही अधिकाऱ्यांवर ओरडत होते, इतक्या गतीने का चाचण्या घेत आहात? याने तुम्हाला काही बक्षिस मिळणार आहे का?"
सिंह यांनी ट्विटमधून चुकीचे तथ्य आणि चुकीची माहिती दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये भीती निर्माण होऊ शकते, असं पोलिसांनी म्हटलं आहे. सिंग यांच्याविरोधात आयपीसी कलम 188( लोक सेवकाने केलेली अवज्ञा), कलम 505-1(लोकांना उकसवणे) आणि महामारी नियंत्रण नियमांच्या इतर वर्गांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूर्यप्रताप सिंह 1982 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते 2015 साली सेनानिवृत्त झाले होते. त्यांची शेवटची पोस्टिंग उत्तर प्रदेश सरकारचे प्रधान सचिव म्हणून झाली होती. सिंह आपल्या कार्यकाळातील बोलक्या स्वभावासाठी ओळखले जातात. 2015 मध्ये सेवानिवृत्त होण्याआधी सहा महिने आधिच त्यांनी स्वैच्छिक निवृत्ती मागितली होती. उत्तर प्रदेशमध्ये एका इमानदार अधिकाऱ्याने काम करणे अशक्य आहे, असं कारण त्यांनी यामागे दिलं होतं. त्यावेळी समाजवादी पक्षाचे अखिलेश सरकार सत्तेत होते. त्यांनी त्यावेळीही सोशल मीडियाच्या माध्यमातून तत्कालीन सरकारवर टीका केली होती. त्यामुळे ते चर्चेत आले होते.
एफआयआर दाखल झाल्यानंतर सिंह यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. 'मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, 69000 सहाय्यक शिक्षक भर्ती प्रकरणी आवाज उठवल्याने तुम्ही नाराज असाल तर माझा बदला घेण्यासाठी एका ट्विटला हत्यार बनवण्याची आवश्यकता नाही. तुम्ही सरळसरळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबून माझ्यावर केस चालवू शकता', असं ते ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.