FIR against Robert Vadra in land scam
FIR against Robert Vadra in land scam 
देश

जमीन गैरव्यवहारप्रकरणी रॉबर्ट वड्रांविरुद्ध गुन्हा 

पीटीआय

नवी दिल्ली : जमीन गैरव्यवहारप्रकरणी हरियानाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुडा आणि सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्याविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे. यात डीएलएफ कंपनी आणि ओकांरेश्‍वर प्रॉपर्टीजचा देखील समावेश आहे. हा गुन्हा गुरुग्रामच्या खेडकी धौला पोलिस ठाण्यात शिकोहपूर जमीन करारावरून गुन्हा दाखल झाला आहे.

दोघांवरही फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, यासंदर्भात वड्रा यांनी दशकभरापासून जुना असलेला मुद्दा उकरून काढला असून, त्यात नवीन काय आहे, असा प्रश्‍न केला आहे. निवडणूक जवळ येत असल्याने तसेच इंधनाचे वाढते दर यांसारख्या ज्वलंत मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी सरकार कारवाई करत आहे.

आपल्यावरील आरोप बिनबुडाचे असल्याचे वड्रा यांनी सांगत आपण देशातच आहोत, आपण कोठेही पळून गेलेलो नाही. कोणाला काही प्रश्‍न विचारायचे असतील तर मी उपलब्ध आहे, असे वड्रा म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT