Madhya Pradesh Physical Abuse Sakal
देश

तरुणीचं अपहरण करून २१ दिवस बलात्कार, भाजप नेत्यासह नातेवाईकावर गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

भोपाळ : एका २१ वर्षीय तरुणीचं लग्नाच्या तीन दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आलं. त्यानंतर तिच्यावर तब्बल २१ दिवस बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी भाजप (BJP) नेता आणि त्यांच्या मेहुण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) सिंगरौली जिल्ह्यात ही घटना घडली.

पीडित तरुणीचं लग्न होतं. मात्र, लग्नाच्या तीन दिवसांपूर्वीच मुलीचं अपहरण झालं. त्याबाबत कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी चौकशी करत बालाघाट येथून मुलीची सुटका केली. त्यानंतर तिची विचारपूस केली असता धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. भाजप नेते कोमल गुप्ता आणि त्यांचा मेहुणा धर्मेंद्र गुप्ता यांनी गुंगीचं औषध देऊन अपहरण केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. पीडिता जबलपूरजवळ पोहोचल्यानंतर शुद्धीवर आली. त्यानंतर कोमल गुप्ता हे घरी निघून गेले आणि धर्मेंद्र पीडितेला घेऊन बालाघाटला रवाना झाला. तिथे आपल्या नातेवाईकाच्या घरी पीडितेला डांबून ठेवले आणि २१ दिवस तिच्यावर वारंवार बलात्कार केला, असे आरोपी पीडितेने तक्रारीमध्ये केले आहेत.

कोमल गुप्ताने आरोपीची मदत केल्यानंतर दोघांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर सिंगरौली पोलिसांनी धर्मेंद्रला अटक केली असून भाजप नेता कोमल गुप्ता अद्यापही फरार आहे. त्याचा शोध सुरू असल्याचं सिंगरौलीचे पोलिस अधीक्षक विरेंद्र प्रताप सिंह यांनी इंडिया टुडेसोबत बोलताना सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missile attack: सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला; येमेनमधील हूती बंडखोरांचा दावा

Pune News : फटाके विक्रीसाठी जागेच्या लिलावातून ४६ लाखांचे उत्पन्न

‘राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत, असं मला कधीच वाटलं नाही’; सोनिया गांधी यांचा मोठा खुलासा

Pune Crime : पंचतारांकित हॉटेलमधील हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस; मॉडेलिंग क्षेत्रातील दोन तरुणींची सुटका

CSK COACHING STAFF : IPL २०२७ आधी CSK मध्ये मोठे बदल! अल्बी मॉर्केल, गॅरेथ बॅटींची एन्ट्री; मोहित शर्माकडे गोलंदाजीची जबाबदारी

SCROLL FOR NEXT