Ashneer Grover Sakal
देश

Ashneer Grover: मोठी बातमी! भारतपेचे माजी MD अश्नीर ग्रोव्हर आणि कुटुंबाविरुद्ध FIR दाखल, काय आहे प्रकरण

अश्नीर ग्रोवरसह त्यांची पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्यांविरोधात तक्रार आली होती.

राहुल शेळके

Ashneer Grover: आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) भारतपेचे माजी व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोव्हर आणि त्यांची पत्नी माधुरी जैन यांच्यासह दीपक गुप्ता, सुरेश जैन आणि श्वेतांक जैन यांच्यासह कुटुंबातील सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

गंभीर गुन्ह्यांच्या आठ कलमांतर्गत सर्वांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. अश्नीर ग्रोव्हर आणि त्यांची पत्नी यांच्यावर फौजदारी खटले 409, 420, 467 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिंटच्या वृत्तानुसार, अश्नीर ग्रोवरसह त्यांची पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्यांविरोधात तक्रार आली होती. त्यानंतर त्यांच्याविरोधात चौकशी करण्यात आली. तक्रार आणि तपासानुसार, आयपीसी कलम 406, 408, 409, 420, 467, 468, 471, 120 बी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या वर्षभरापासून वाद:

गेल्या सहा महिन्यांत ग्रोव्हरवर पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जानेवारी 2022 मध्ये आर्थिक फसवणुकीचा आरोप झाला होता. तेव्हापासून भारतपे आणि अश्नीर ग्रोव्हर यांच्यातील वाद वाढला आहे. अश्नीर ग्रोव्हरला गेल्या वर्षी मार्चमध्ये भारतपेमधून काढून टाकण्यात आले होते.

81.28 कोटींची फसवणूक प्रकरण:

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, दिल्लीस्थित फिनटेक युनिकॉर्नने अशनीर ग्रोव्हर आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध दिल्ली पोलिसांच्या EOW मध्ये 81.28 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती.

यामध्ये अश्नीर ग्रोव्हर आणि त्यांच्या कुटुंबावर गुन्हेगारी, कट रचणे, फसवणूक करणे आणि पुरावे नष्ट करणे असे आरोप ठेवण्यात आले होते.

याव्यतिरिक्त, भारतपेने दिल्ली उच्च न्यायालयात दिवाणी खटला देखील दाखल केला होता, ज्यामध्ये अश्नीर ग्रोव्हर आणि त्याच्या कुटुंबाकडून 88.67 कोटी रुपयांहून अधिक वसूल करण्याची मागणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG supply India news : आनंदाची बातमी! गॅस टंचाई दूर होणार, स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून २० हजार ४०० मेट्रिक टनाचे एलपीजी मुंबईकडे रवाना

Mumbai News: यूपी-बिहार आणि अन्य शहरातून येणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबईत परवडणारी घरे मिळणार; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Viral Video : विराट कोहलीची 'कॉपी' करायला गेला, बाबर आझम स्वतःच्याच जीवाशी खेळला... थोडक्यात वाचला, सर्व खेळाडू पळत आले...

Chhagan Bhujbal helicopter landing : हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये का उतरावं लागलं छगन भुजबळांनी सविस्तर सांगितलं

Monali Jadhav : जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर मोनालीने पुणे शहर पोलीस दलात कॉन्स्टेबल पद मिळवत कुटुंबाचे स्वप्न केले साकार

SCROLL FOR NEXT