tejswi yadav 
देश

बिहार - RJD ला मोठा धक्का; माजी नेत्याच्या हत्येनंतर तेजस्वीसह 6 जणांविरोधात FIR

सकाळ वृत्तसेवा

पूर्णिया - बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. यातच राष्ट्रीय जनता दलाला मोठा धक्का बसला आहे. आऱजेडीचे माजी नेते शक्ती मलिक यांच्या हत्येप्रकरणी बिहार पोलिसांनी रविवारी पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह 6 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, माजी नेते शक्ती मलिक यांच्या कुटुंबियांनी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, माजी आरोग्य मंत्री तेज प्रताप यादव, अनिल कुमार साधू पासवान, कालो पासवान यांच्यासह सहा जणांवर कट रचून हत्या केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी केहट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पूर्णियाचे पोलिस अधीक्षक विशाल शर्मा यांनी याची माहिती दिली. 

आरजेडी माजी नेते शक्ती मलिक यांची रविवारी सकाळी गोळी घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर शक्ती यांची पत्नी खुशबू देवी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. यामध्ये खुशबू यांनी तेजस्वी यादव यांच्यासह सहा जणांवर आरोप केला आहे. या लोकांकडून कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली जात होती असंही खुशबू यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

शक्ती मलिक यांना रविवारी पहाटेच्या सुमारास तोंडाला कापड बांधलेल्या तिघांनी घरात घुसून मारले. गोळीबार करून मारेकरी तिथून फरार झाले. त्यावेळी घरात मुले, पत्नी आणि ड्रायव्हर होते. गोळीबारानंतर जखमी झालेल्या शक्ती यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी शक्ती यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Leader Death : युपीचे माजी मंत्री भुर्जींचा आमदार निवासाच्या सातव्या मजल्यावरून पडून मृत्यू; नेमकं काय घडलं?

US-China: अमेरिकेकडून ‘ड्रॅगन’ची नाकेबंदी; समुद्राखालील केबलसाठी १७.५८ कोटी डॉलर, चीनविरोधी प्रकल्पांसाठी निधी

Koyna Dam: कोयना पायथा वीजगृहातून आज विसर्ग! पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम; धरणातील पाणीसाठा ८१.१२ टीएमसीवर

Warana Dam Water Release : वारणा धरणातून 6,900 क्युसेकने विसर्ग सुरू; 621.50 मीटरवर पाणीपातळी, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, कोयनेतूनही आज विसर्ग

Nagpur Waterlogging: महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे शहर पाण्यात!; रस्त्यांना नदीचे स्वरुप तर चौक झाले तलाव;नाले सफाईची पोलखोल; घरांमध्ये शिरले पाणी, बोटीद्वारे विद्यार्थ्यांची सुटका

SCROLL FOR NEXT