twitter 
देश

ट्विटरविरोधात गुन्हा; चुकीची माहिती दिल्याचा आरोप

नामदेव कुंभार

पोक्सो कायद्याअंतर्गत ट्विटरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लहान मुलांसंदर्भात चुकीची माहिती दिली असून पोक्सो कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप ट्विटरवर करण्यात आला आहे. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचे(NCPCR) अध्यक्षांनी ट्विटरविरोधात दिल्ली पोलिसांना पत्र लिहून गुन्हा दाखल करण्याची विनंती केली होती. लहान मुलांसाठी ट्विटर हा प्लॅटफॉर्म सुरक्षित नाही. जोपर्यंत सुरक्षित होत नाही, तोपर्यंत लहान मुलांना ट्विटर वापरण्याची परवानगी देऊ नये, असं पत्र केंद्राला लिहिल्याचं राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचे(NCPCR) अध्यक्ष प्रियंक कानूनगो यांनी सांगितलं आहे.

NCPCR अध्यक्ष प्रियंक कानूनगो म्हणाले की, ट्विटरवर अनेक व्हॅट्सअॅप ग्रुप्सच्या लिंक आहेत, ज्यामध्ये मुलांवरील लैंगिक अत्याचारासंदर्भातील फुटेज आहे. या आपत्तिजनक व्हिडिओची खरेदी-विक्रीही होत आहे. यासारखे अनेक ‘डार्क वेब’ टूलकिट ट्विटरवर उपलब्ध आहेत.

प्रियंक कानूनगो म्हणाले की, “डार्क वेब आणि डीप वेब यासारख्या इंटरनेटच्या घातक जगात जाण्याच्या अनेक लिंक्स ट्विटरवर उपलब्ध आहेत. या लहान मुलांसाठी सुरक्षित नाहीत. यासंदर्भात राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने(NCPCR) ट्विटरला समन्स पाठवत माहिती मागवली होती. मात्र, ट्विटरने आयोगाला चुकीची माहिती पुरवली. ट्विटरनं पॉक्सो कायद्याच्या नियम 11,15,19 चं उल्लंघन केलं आहे. तसेच IPC कलम 199 चेही उल्लंघन केलं आहे. त्यामुळेच दिल्ली पोलिसांना पत्र लिहून गुन्हा दाखल करण्याची विनंती केली आहे. आज, ट्विटरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Restrictions: पुण्यात आज रात्रीपासून १४ दिवसांसाठी जमावबंदी का? नेमकं कारण काय?

Kolhapur Student End Life : वडील, भावाने गाडीवरून कॉलेजला सोडलं नाही; चिडून थेट गळफासचं घेतला, कोल्हापुरातील घटनेनं खळबळ

Latest Marathi News Live Update : कांद्याला हमीभावासाठी शेतकऱ्यांचा संताप उसळला

रणवीर सिंह आता बॉलिवूडमध्ये काम करु शकणार नाही? ‘डॉन 3’ वादात रणवीर सिंह अडचणीत, FWICE ची मोठी कारवाई

Kolhapur कार-कंटेनरची धडक, २८ वर्षीय डॉक्टरचा जागीच मृत्यू; हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या दिवशीच काळाचा घाला

SCROLL FOR NEXT