Noida Logix Mall Fire Esakal
देश

Noida Logix Mall Fire: नोएडाच्या लॉगिक्स मॉलमध्ये आग, अनेक अग्निशमन दल घटनास्थळी, शोरूम्स करण्यात आली रिकामी

Noida Logix Mall Fire: नोएडाच्या लॉजिक्स मॉलमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Noida Logix Mall Fire News: नोएडा येथील लॉजिक्स मॉलमध्ये असलेल्या शोरूममध्ये आग लागल्याची भीषण घटना समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या आणि नोएडा पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी तत्काळ संपूर्ण मॉल रिकामा केला.

मिळालेल्या माहितीनुसार, नोएडाच्या सेक्टर-24 पोलिस स्टेशन अंतर्गत लॉजिक्स मॉलमध्ये असलेल्या कपड्यांच्या शोरूममध्ये आज(शुक्रवारी) सकाळी आग लागली. पोलिस स्टेशन सेक्टर 24 आणि अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी हजर आहेत. मॉलमध्ये धुराचे लोट भरल्यानंतर सर्वजण बाहेर गेले. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

सध्या मॉलमध्ये कोणीही अडकलेले नाही. मॉलमध्ये धुराचे लोट भरू लागताच सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुरुवातीच्या टप्प्यात आग विझवण्यासाठी मॉल व्यवस्थापनाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, मात्र आगीची व्याप्ती वाढल्याने पोलीस दल आणि अग्निशमन विभागाला याबाबत माहिती देण्यात आली. यानंतर अग्निशमन दलाच्या 6 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. यानंतर आणखी 4 वाहने तेथे पोहोचली. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मॉलच्या बाहेर मोठ्या प्रमाणात लोक जमले आहेत.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले की, सकाळी 11 वाजता अग्निशमन विभागाकडून नियंत्रण कक्षाद्वारे आम्हाला माहिती मिळाली की, बंद असलेल्या लॉजिक्स मॉलच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या आदिदास शोरूमला आग लागली आहे. तत्काळ कारवाई करत आम्ही 10 वाहने येथे पाठवली आहेत.

अग्निशमन दलाच्या जवानांनी आग पूर्णपणे विझवली, आता मॉलमध्ये भरलेला धूर मशिनद्वारे काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही जवळपासच्या दुकानातील वायरिंग आणि आग तपासत आहोत. अधिकारी म्हणाले की, आम्ही संपूर्ण मॉल वरपासून खालपर्यंत तपासला आहे, कोणत्याही मजल्यावर कोणीही आत अडकलेले नाही. शोरूमचे शटर बंद असल्याने तसेच मॉलही पूर्णपणे उघडला नसल्याने सुरुवातीला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT