First batch of 5 Rafale jets to land in India on July 29 
देश

राफेलची पहिली तुकडी 'या' तारखेला होणार भारतात दाखल

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राफेल फायटर विमानांचा करार झाल्यापासून राफेल भारतात कधी दाखल होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. अशात राफेल या महिन्याच्या शेवटी-शेवटी म्हणजे २९ किंवा ३० जुलै रोजी भारतात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हरयाणातील अंबाला एअर फोर्स स्टेशनवर ही राफेल फायटर विमाने तैनात करण्यात येतील.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

युद्धात गेम चेंजर ठरु शकणाऱ्या या विमानांचा अंबाल एअर बेसवर मुख्य तळ असणार आहे. सर्व काही नियोजनानुसार झाले, तर २० ऑगस्टला पारंपारिक पद्धतीने सोहळा आयोजित करुन या फायटर विमानांचा भारतीय हवाई दलात समावेश करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भारताने फ्रान्सबरोबर अशी ३६ राफेल विमाने खरेदी करण्याचा करार केला आहे. पूर्णपणे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज विमाने फ्रान्सकडून भारताला देण्यात येतील. भारतात दाखल झाल्यानंतर लवकरात लवकर या विमानांचा वापर करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आएएफच्या एअर क्रू आणि ग्राऊंड क्रू टीमला हे विमान कसे हाताळायचे, त्याबद्दल व्यापक असे प्रशिक्षण देण्यात आले आहे. 

भारतीय सैन्याला मोठा फायदा
भारतीय सैन्याच्या ताफ्यात राफेल दाखल झाल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असून त्यांची ताकद वाढेल. सध्या चीन आणि पाकिस्तानकडे राफेलच्या तोडीचे एकही विमान नाही. भारताला मिळणारी राफेल फायटर विमाने मिटिओर आणि स्काल्प अशा मिसाइल्सनी सुसज्ज असतील. यामुळे शत्रुच्या प्रदेशात खोलवर अचूक हल्ला करण्याची भारतीय हवाई दलाची क्षमता कैकपटीने वाढणार आहे तसेच हवाई वर्चस्व सुद्धा प्रस्थापित करता येईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: 'दहा वाजेपर्यंत MPSCच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवा, नाहीतर...', मनोज जरांगे नदीपात्रात ठाण मांडून, मुख्यमंत्री फोनवरुन बोलणार

Latest Marathi News Live Update: सहकार कायद्यात काळानुरूप होणार ' बदल ' राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समिती जाहीर

T20 World Cup: टी-२० वर्ल्डकप २०२६ साठी दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे संघांची घोषणा; नव्या चेहऱ्यांना संधी, पाहा संपूर्ण टीम

Pune Election 2026 : कात्रजमध्ये निवडणुकीचा मोठा 'धडाका'! नाकाबंदीत तब्बल ६७ लाखांची रोकड जप्त

Pune Robbery : रुग्णाच्या नावाखाली सापळा; सहकारनगर हद्दीत डॉक्टरला लुटणारे सीसीटीव्हीत कैद!

SCROLL FOR NEXT