PM Modi in Ayodhya Esakal
देश

PM Modi in Ayodhya: अखेर प्रभू राम आपल्या घरी परतले, प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्येतील रामलल्लाचे पहिले रूप

PM Modi in Ayodhya: अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आज पार पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रमुख यजमान म्हणून पूजा केली. प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यानंतर प्रभू राम लल्ला यांचे पहिले रूप समोर आले आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आज पार पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रमुख यजमान म्हणून पूजा केली. मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी ८४ सेकंदांचा अत्यंत शुभ मुहूर्त होता. शुभ वेळ 12.29 मिनिटे 8 सेकंद ते 12.30 मिनिटे 32 सेकंद इतकी होती. अभिषेक झाल्यानंतर रामललाच्या डोळ्याची पट्टी काढण्यात आली. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर अयोध्येतील प्रभू राम लल्ला यांचे पहिले रूप समोर आले आहे.

अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल हे देखील गर्भगृहात उपस्थित होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (सोमवारी) अयोध्या राम मंदिराच्या गर्भगृहात प्रभू राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर, 51 इंच मूर्तीचा पहिली झलक जगासमोर आली. कर्नाटकातील अरुण योगीराज यांनी राम लल्लाची प्रतिमा साकारली आहे.

रामलल्लाची मूर्ती दागिन्यांनी सजलेली आहे. डोक्यापासून पायापर्यंत अनेक दागिन्यांनी मुर्ती सजवण्यात आली आहे. त्याच्या हातात सोन्याचे धनुष्य आणि बाण आहे. कपाळाला सोन्याचा तिलक लावलेला आहे.

आज(सोमवारी) अयोध्येत राम लाला यांचा अभिषेक झाला. यासोबतच रामलल्लाचा पहिला पूर्ण फोटोही समोर आला आहे. यामध्ये रामलल्ला पिवळ्या रंगाच्या वस्त्रात दिसत आहे. त्यांच्या हातात धनुष्यबाण आहे.अभिषेक झाल्यानंतर मोदींनी सोन्याच्या दांडीने रामलल्लाच्या मूर्तीच्या डोळ्यावरील पट्टी काढून टाकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT