New Parliament Building esakal
देश

New Parliament Building : वाद उदंड झाले, पण ही नवी संसद दिसते कशी? पाहा लोकसभा-राज्यसभेचा खास व्हिडिओ

रोहित कणसे

नवी दिल्ली : देशाच्या नवीन संसद भवन इमारतीचे येत्या २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या नवीन संसद भवनाची इमारत आतून कशी दिसते याबद्दल सर्वांच्या मनात उत्सुकता आहे. यादरम्यान आता संसदे भवन इमारतीचा व्हिडीओ समोर आला आहे. (First look of New Parliament building)

या व्हिडीओमध्ये संसद इमारतीच्या आतील तसेच बाहेर भाग देखील दाखवण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये राजसभा आणि लोकसभा सभागृह सर्व कोनातून दाखवण्यात आलेत. हा व्हिडीओ पाहाताना तुम्हाला संसदेत गेल्याचा अनुभव येतो.

महत्वाचे म्हणजे १० डिसेंबर २०२० रोजी नवीन संसद भवनाच्या बांधकामाची पायाभरणी करण्यात आली होती. संसद भवनाच्या नवीन संकुलाच्या बांधकामासाठी ८६१ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता पण नंतर तो १२०० कोटी रुपये इतका झाला.

दरम्यान या न संसद भवनाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाबाबतही बरेच राजकारण होत आहे. २८ मे रोजी या इमारतीचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. देशातील अनेक विरोधी पक्ष हे नवीन संसद भवन संकुलाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी करावे अशी मागणी करत आहेत.

यामुळेच काँग्रेस आणि इतर २० विरोधी पक्षांनी संसद भवनाच्या नवीन संकुलाच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला आहे. त्यांच्याकडून या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. भाजप राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना उद्घाटनाची संधी न देऊन त्यांच्या पदाचा अपमान करत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Nagpur EVM Training: आगामी निवडणुकीत ‘एस-३’ मतदान यंत्राचा वापर;नागपूर जिल्ह्याला तीन हजार कंट्रोल युनिट प्राप्त; कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

पत्नीशी वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, ३२ वर्षीय मुलाने वडिलांना झोपेतच संपवलं; डोंबिवली हादरली

SCROLL FOR NEXT