India Alliance 
देश

INDIA Rally Cancelled : इंडिया आघाडीची भोपाळला होणारी पहिली सभा रद्द; कारण जाणून घ्या

दोन दिवसांपूर्वीच झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत आघाडीची सभा घेण्याचा निर्णय झाला होता.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : दिल्लीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी दोन दिवसांपूर्वी झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत इंडिया आघाडीची सभा घेण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार पहिली सभा मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ इथं घेण्याचं ठरलं होतं, पण आता अचानक ही सभा रद्द करण्यात आली आहे. (First rally of INDIA Alliance to be held in Bhopal cancelled says Congress leader Kamalnath)

कमलनाथ यांची माहिती

समन्वय समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत काँग्रेस महासचिव के सी वेणूगोपाल यांनी जाहीर केलं होतं की, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळ इथं इंडिया आघाडीची पहिली सभा घेण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

त्यामुळं आता खऱ्या अर्थानं विरोधक या सभेतून लोकसभेचं रणशिंग फुंकणार अशी चर्चा सुरु झाली होती. पण अचानक ही सभा न घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कमलनाथ यांनी सांगितल्याचं विविध माध्यमांनी म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

सभेबाबत अद्याप निर्णय नाही - सुरजेवाला

काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी सांगितलं की, "पक्षाच्या प्रमुखांनी अद्याप इंडिया आघाडीच्या भोपाळमधील रॅलीबाबत निर्णय घेतलेला नाही. पण यावर एकदा निर्णय झाल्यानंतर लवकरच तुम्हाला कळवण्यात येईल"

भाजपचा प्रोपोगंडा?

दरम्यान, मध्य प्रदेशात 'सनातन धर्म' वादाविरोधात भाजपच्या जनआक्रोश मोर्चा निघणार आहे. या मोर्चाला घाबरुन इंडिया आघाडीनं भोपाळमध्ये होणारी आपली पहिली सभा रद्द केल्याचं मध्य प्रदेश भाजपनं म्हटलं आहे. पण प्रत्यक्षात ही सभा रद्द होण्याचं कारण वेगळचं असताना भाजपनं आपल्या मोर्चामुळं ती रद्द झाल्याचा प्रोपोगंडा सुरु केला असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.

आघाडीत सर्वकाही आलबेल?

इंडिया आघाडीतील अंतर्गत मतभेदांमुळं ही सभा रद्द झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळं पहिलीच सभा रद्द झाल्यानं आता इंडिया आघाडीत सर्व ठीक आहे का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT