fitness freak ghost excercise in jhansi open gym video viral 
देश

भूत व्यायाम करतं? व्हिडिओ व्हायरल...

वृत्तसंस्था

लखनौ (उत्तर प्रदेश): झाशी येथील काशीराम पार्कमध्ये भूत व्यायाम करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडिओ पाहिल्यानंतर नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. पण, भूत नसून त्यामागे शास्त्रीय कारण असल्याची उघड झाले.

झाशीच्या काशीराम पार्कमध्ये नागरिकांना व्यायाम करण्यासाठी मशिन बसविण्यात आली आहेत. पण, या मशिनवर कोणीही बसलेले नसताना मशीन जोरजोरात हालताना दिसत आहे. यामुळे भूत व्यायाम करत असल्याची अफवा पसरली. शिवाय, व्हिडिओही व्हायरल होऊ लागले. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. व्हिडिओमधील दृश्य पाहिल्यानंतर आश्चर्य वाटते. या मशीनवर खरंच भूत व्यायाम करत आहे, असे जाणवते. पण, ही अफवा आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'या पार्कमध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरक्षारक्षक नोकरी करत आहे. पण, त्यांना असे कधीच दिसले नाही. कोणी तरी खोडसाळ वृत्तीने व्हिडिओ तयार करून व्हायरल केला आहे. खरंतर ग्रीसिंगमुळे हे मशीन आपोआप हालत आहे. या मशिनला सुरवातीला थोडे हलवले की ग्रीसिंगमुळे पुढील काही मिनिटे हालत राहते. बरोबर या दरम्यानच्या वेळातील कोणतरी व्हिडिओ तयार केला आणि व्हायरल केला. मुद्दाम व्हिडिओ व्हायरल करणाऱया व्यक्तीचा तपास सुरू आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT