nirmala sitharaman sakal media
देश

निर्मला सीतारमण यांनी पुन्हा मारली बाजी

फोर्ब्स नियतकालिकाने २०२१ मधील जगातील १०० प्रभावी महिलांची यादी प्रसिध्द केली आहे

सकाळ डिजिटल टीम

Forbes Most Powerful Women : फोर्ब्स नियतकालिकाने २०२१ मधील जगातील १०० प्रभावी महिलांची यादी प्रसिध्द केली आहे. या यादीत देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सलग तिसऱ्यांदा स्थान मिळवले आहे. त्यांनी अमेरिकेच्या महिला अर्थमंत्री जेनेट येलेन यांना मागे टाकत ३७ व्या स्थानावर झेप घेतली आहे.

फोर्ब्सने मंगळवारी जगभरातील १०० प्रभावी महिलांची १८ वी वार्षिक रॅन्क घोषित केली. यामध्ये प्रमुख सीईओ, उद्योजक, धोरण राबवणारे यांचा समावेश आहे. सीतारमण यापुर्वीही २०२० साली ४१ व्या तर २०१९ मध्ये ३४ व्या स्थानी होत्या. फोर्ब्सने आपल्या नियतकालिकात सांगितले की, "निर्मला सितारामण या भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत. सीतारामन यांनी युनायटेड किंग्डम येथील कृषी संबधित संघटना आणि बीबीसी वर्ल्ड मध्ये भूमिका निभावल्या."

८८ व्या स्थानावर नायकाच्या संस्थापिका फाल्गुनी नायर

ब्युटी आणि लाइफस्टाइल कंपनी नायका (Nykaa) च्या संस्थापिका आणि सीईओ फाल्गुनी नायर (Falguni Nayar) या नियतकालिकात ८८ व्या स्थानावर आहेत. त्यांनी २०१२ साली आपली नोकरी सोडून नायका (Nykaa) या कंपनीची स्थापना केली होती. नायकात अमेरिकेतील खाजगी इक्विटी कंपनी टीपीजी ग्रोथ सोबत अरबपति हर्ष मारीवाला व हैरी बंगा यांचीही गुंतवणुक आहे. भारतातील सीतारमण आणि नायर यांच्याव्यतिरिक्त ५२ व्या स्थानी HCL च्या सीईओ रोशनी नादर मल्होत्रा (Roshni Nadar Malhotra) आणि बायोकॉनच्या कार्यकारी अध्यक्षा अध्यक्ष किरण मजूंदर शॉ या ७२ व्या स्थानी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT