crime sakal
देश

परीक्षेत कॉपीच्या संशयावरून शिक्षकाने काढायला लावले कपडे; ९वीच्या मुलीने पेटवून घेतलं

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - झारखंडमधील जमशेदपूर येथे एका विद्यार्थिनीला परीक्षेत शिक्षकाने कॉपीच्या संशयावरून कपडे काढण्यास भाग पाडले. यामुळे व्यथीत झालेल्या मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Jharkhand girl sets herself on fire )

या घटनेनंतर इयत्ता 9वीच्या विद्यार्थीनीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शिक्षकाला संशय आला की विद्यार्थिनी तिच्या गणवेशात पेपर चिट लपवून ठेवली आहे.

विद्यार्थिनीने म्हटलं की, शिक्षकाने तिचा अपमान केला. जोरदार प्रतिकार करूनही कपड्यात चिट लपवल्याचा दावा करत वर्गाशेजारील एका खोलीत तिचे कपडे काढायला लावले. शिक्षकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

दरम्यान पीडितेच्या आईने म्हटलं की, अपमान सहन न झाल्याने शाळेतून परतल्यानंतर काही वेळातच मुलीने स्वत:ला पेटवून घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026: महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर! तुमचा तालुका आहे का चेक करा... जिल्हानिहाय संपूर्ण यादी समोर

वानर थेट वाइन शॉपमध्ये घुसला; दारू प्यायली अन् पुढे जे घडलं ते पाहून लोकंही थक्क

Latest Marathi News Live Update : दुष्काळसदृश परिस्थितीने सोयाबीन पिकाला फटका; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून मरडसगावात पिकांची केली पाहणी

तेव्हा मी अरिजीतपेक्षा जास्त लोकप्रिय होतो... अभिजीत सावंतचं मोठं विधान; म्हणतो- त्याला कुणी ओळखत नव्हतं

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

SCROLL FOR NEXT