Army Man Suicide google
देश

लष्करातील माजी कर्मचाऱ्याची पत्नीसह धावत्या ट्रेनसमोर उडी

सकाळ डिजिटल टीम

हैदराबाद : लष्कराच्या माजी कर्मचाऱ्याने पत्नीसह धावत्या ट्रेनसमोर उडी घेत आत्महत्या (Suicide) केली. ही घटना तेलंगणात घडली असून सिकंदराबामधील (Secunderabad Telangana) बोलारम येथे या जोडप्याचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत रेल्वे रुळांवर पडले होते. दोघांच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

वाय कोंडय्या (५५) आणि त्यांची पत्नी भूलक्ष्मी असे आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. दोघेही सिकंदराबादमध्ये राहत होते. वाय कोंडय्या यांनी सैन्यात लिपिक म्हणून काम केले आहे. काही दिवसांपूर्वी ते निवृत्त झाले. सोमवारी ३१ जानेवारीला हे जोडपं बाहेर जातो, असं मुलीला सांगून निघून गेले. पण, घरी परतलेच नाहीत. त्यामुळे त्यांच्या मुलीने बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली. मंगळवारी सकाळीच रेल्वे पोलिसांना सिकंदराबादमधील बोलारमजवळ रेल्वे रुळावर दोघांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडललेले दिसले. त्यानंतर त्यांनी संबंधित पोलिस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत पंचनामा केला. तसेच गुन्हा दाखल करून मृतदेह गांधी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. याप्रकरणी अधिक तपास सिकंदराबाद पोलिस करत आहे.

आत्महत्येचं कारण नेमकं काय? -

मुलीच्या वडिलांवर कर्जाचा डोंगर होता. आर्थिक टंचाईमुळे ते चिंतेत होते. तसेच ते नैराश्यामध्ये देखील गेले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज मुलीनं व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Leaders Join Congress : ममता बॅनर्जींना मोठा धक्का! १०० हून अधिक नेते-कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला; यावेळी भाजप नाही तर कॉंग्रेसमध्ये प्रवेश

आजचे राशिभविष्य - 29 सप्टेंबर 2026

आरोग्य‘चेतना’ : स्पायनल ट्युमरची अत्याधुनिक शस्त्रक्रिया

Marathi News Live Updates: ठाकरे बंधूंची आज शिवतीर्थावर पत्रकार परिषद; एसआयआर प्रक्रियेसह निवडणूक आयोगाच्या मुद्द्यांवर भूमिका मांडणार

Maharashtra Weather : पावसाची पुन्हा एन्ट्री! राज्यातील ८ जिल्ह्यांना येलो अलर्ट; तुमच्या भागात कसे असेल हवामान ?

SCROLL FOR NEXT