Former Chhattisgarh CM Ajit Jogi slips into coma on ventilator support 
देश

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी कोमामध्ये

वृत्तसंस्था

रायपूर : छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांना हृदयक्रिया अचानक बंद पडल्याने शनिवारी दुपारी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते अजूनही कोमामध्ये आहेत. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

काल (ता. १०) रविवारी दुपारी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार ७४ वर्षांच्या जोगी यांची प्रकृती अत्यंत नाजूक असून, आठ तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून आहे. त्यांच्या मेंदूचे कार्य जवळजवळ थांबल्याची लक्षणे असल्याने पुढील ४८ तास अत्यंत काळजीचे आहेत.

जगाची चिंता वाढवणारी बातमी : कोरोनामुक्त झालेल्या वुहानमध्ये पुन्हा सापडला रुग्ण

शनिवारी (ता. ०९) दुपारी जोगी यांनी त्यांच्या निवासस्थानी एक चिंचोका खाल्ला असता तो श्वासनलिकेत अडकून ते व्हीलचेअरमध्ये अचानक कोसळले होते. त्यावेळी ते बेशुद्ध होऊन त्यांच्या हृदयाचे ठोकेही काही काळ थांबले होते. पुरेशा ऑक्सिजन पुरवठ्याअभावी त्यांच्या मेंदूला सूज आली असून, त्यांचा सिटी स्कॅन काढला जाणार आहे. अजित जोगी हे कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असून ते नोव्हेंबर २००० ते डिसेंबर २००३ या काळात छत्तीसगडचे मुख्यमंत्री होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT