Prithviraj Chavan criticizes PM Narendra Modi
Prithviraj Chavan criticizes PM Narendra Modi esakal
देश

Prithviraj Chavan : 'पंतप्रधान मोदींनी देश विकायला काढलाय, हे आता लोकांच्या लक्षात आलंय'

सकाळ डिजिटल टीम

लव्ह जिहाद आणि इतर धार्मिक प्रश्न जाणीवपूर्वक उपस्थित करून देशाची दिशा बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे.

कोल्हापूर : ‘केंद्रात मोदी सरकार (Modi Government) स्थापन होऊन आज नऊ वर्षे पूर्ण झाली. मात्र, या नऊ वर्षांत देशात महागाई, बेरोजगारी वाढली. शेतकऱ्यांना हमीभाव नाही. शेतकरी उद्‌ध्वस्त झाला आहे. अदानींना फायदा करून देण्यासाठी भ्रष्टाचार केला, करात वाढ करून देशाला लुटले, देशात सुविधा देण्यास मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची जादू आता संपली आहे. १३५ लाख कोटी कर्ज काढून देशाला कर्जात लोटले. अनेक कंपन्या विकायला काढल्या आहेत. त्यामुळे देशातील अर्थव्यवस्था उद्‌ध्वस्त झाली असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी येथे केली. शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

चव्हाण म्हणाले, की 'पंतप्रधान मोदींनी देश विकायला काढला, हे आता लोकांच्या लक्षात आले आहे. त्याचाच परिणाम म्हणून कर्नाटकमध्ये काँग्रेसची (Congress) एकहाती सत्ता आली. अचानक केलेल्या नोटबंदीमुळे देश बेरोजगारी आणि आर्थिक संकटात आला आहे, हे सांगायला आता त्यांना तोंड नाही. त्यामुळे आज नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांना काँग्रेसकडून नऊ प्रश्‍न विचारले आहेत. त्याची त्यांनी उत्तरे द्यावीत.'

ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा गैरवापर केला जात आहे. देशातील सामाजिक ऐक्य आणि शांतता धोक्यात आली. लव्ह जिहाद आणि इतर धार्मिक प्रश्न जाणीवपूर्वक उपस्थित करून देशाची दिशा बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे, असंही ते म्हणाले. या वेळी आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर उपस्थित होते.

महाविकास आघाडीला रोखू शकत नाहीत

चव्हाण म्हणाले, की कर्नाटकमध्ये काँग्रेसचा एकहाती विजय झाला आहे. भाजपची मते कमी झाली नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. त्यांना बंगळूर विभागात जास्त मतदान झाले असले, तरी इतर सर्व विभागांत त्यांना जनतेने नाकारले आहे. भाजपने कर्नाटकला धार्मिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला. त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आता देशातील १९ विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपविरोधात आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकाराने महाविकास आघाडीला ते आता रोखू शकत नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

तयारी झालेली पण पायलट घाबरले... पवारांच्या बंडाबद्दल पहिल्यांदाच खुलासा; पटेलांनी सांगितली राष्ट्रवादीची जन्मकथा

T20 World Cup: "वर्ल्ड कपमध्ये घ्यायला पाहिजे होतं राव !"; सुनील अण्णाच्या जावयासाठी रितेश देशमुखची बॅटिंग, झाला ट्रोल

Latest Marathi News Live Update: अटारी ड्रग्ज प्रकरणात आणखी एका प्रमुख आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT