Former Kerala Minister and MLA Thomas Chandy passes away at 72 
देश

राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि आमदार थॉमस चंडी यांचे निधन; पवारांकडून श्रद्धांजली

सकाळ वृत्तसेवा

कोची : केरळाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार थॉमस चंडी यांचे आज वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. थॉमस चंडी यांना कॅन्सर या रोगाने पछाडले होते. काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचारही चालू होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

थॉमस चंडी हे पिनरई विजयन यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिले असून ते कुट्टानाड विधानसभा मतदारसंघाचे प्रतीनिधीत्व करायचे. केरळातील कोची शहरात त्यांचे निधन झाले. चंडी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे केरळ प्रदेशाध्यक्षपदही सांभाळले होते. कोचीमधल्या कडवंथरा या त्यांच्या राहत्या घरी त्यांचे साधारणतः ३:३०च्या सुमारास निधन झाले.डाव्या सरकारमध्ये त्यांनी परिवहन खात्याचा कारभार सांभाळला होता. थॉमस चंडी हे एक मोठे उद्योगपती होते. त्यांचा जन्म १९४७ मध्ये झाला होता. केरळा विधानसभेत ते सगळ्यात श्रीमंत असणारे आमदार होते. 

धक्कादायक ! फडणवीस सरकारच्या एका वर्षात ६० हजार कोटींचा घोळ; कॅगचा ठपका

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थॉमस चंडी यांना श्रद्धांजली वाहिली असून चंडी कुटुंबियांच्या दुःखात मी सामील असल्याचे सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhairyasheel Mohite-Patil: संकटकाळी सोबत राहिलेल्या तरुणांना संधी देणार: धैर्यशील मोहिते-पाटील; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता संवाद मेळावा

Latest Marathi Live Update News: कांदिवलीत मंत्री उदय सामंत यांची शाखा भेट; महापालिका निवडणुकीची तयारीचा आढावा

VIRAL VIDEO : जेव्हा चालू सीनमध्ये सुबोधला खरोखर कुत्रा चावला ; किस्सा सांगताना तेजश्रीला हसू अनावर

Coconut Water: नारळाचे पाणी थेट पिऊ नका तज्ज्ञांचा सल्ला, जाणून घ्या कारण

Satara Fraud:'नोकरीच्या आमिषाने ३८ लाखांची फसवणूक'; रयत संस्थेमध्ये नोकरीचे आमिष,भाजप पदाधिकाऱ्याच्या पतीवर गुन्हा

SCROLL FOR NEXT