Iqbal Ansari 
देश

Iqbal Ansari: अयोध्या खटल्यातील पक्षकार इक्बाल अन्सारींना मिळालं घरपोच निमंत्रण; सल्ला देताना म्हणाले...

यावर प्रतिक्रिया देताना अन्सारी यांनी सर्वांना एक सल्लाही दिला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

अयोध्येतील वादग्रस्त जमीन प्रकरणाच्या खटल्यात मुस्लिमांच्या बाजूनं पक्षकार असलेले इक्बाल अन्सारी यांना देखील राम मंदिराच्या उद्घाटनं सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्यावतीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी अन्सारी यांच्या घरी जाऊन त्यांना निमंत्रण पत्रिका दिली. येत्या २२ जानेवारी रोजी राम मंदिरात रामलल्लाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. (Former litigant in Ayodhya land dispute case Iqbal Ansari received an invitation to Pranpratishtha ceremony of Ram Temple

सोहळ्याला लावणार हजेरी

या कार्यक्रमाचं निमंत्रण अन्सारी यांनी स्विकारलं असून आपण या सोहळ्यासाठी हजेरी लावणार असल्याचं म्हटलं आहे. अन्सारी पुढे म्हणाले, अयोध्येत भगवान राम आता विराजमान होत आहेत. जे लोक इथं येऊन दर्शन घेतील पुजाअर्चा करतील ते चांगलं काम करतील. यामुळं त्यांची नियत पण चांगली राहिल, रामानं सांगितलेल्या रस्त्यावर ते लोक चालतील. (Latest Marathi News)

अन्सारींनी दिला सल्ला

आम्हाला वाटतं की, लोकांनी आपल्या धर्माच्या शिकवणुकीप्रमाणं चालावं तसेच त्यांनी सर्वांबरोबर चांगलं वागावं. आम्हाला याचा आनंद आहे की, भगवान राम आता प्रत्यक्ष मंदिरात विराजमान होत आहेत. तसेच सर्वांना एक सल्ला देतो की अयोध्या एक अशी जमीन आहे जिथं हिंदु-मुस्लीम-शीख-ख्रिश्चन सर्वांमध्ये मैत्रीभाव आहे आणि तो पुढेही सुरु राहिल. (Marathi Tajya Batmya)

२०१९ मध्ये सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला याचा संपूर्ण देशातील मुसलमानांनी सन्मान केला. एकात्मता राहिली आहे. कुठेही धरणं आंदोलनं झालं ना काही. आज हिंदू आणि मुस्लिमांमध्ये कोणतीही फूट नाही, मंदिराचं काम पूर्ण झालं आहे आणि तिथं आता भगवान राम विराजमान होणार आहेत. हिंदू-मुस्लिमांमध्ये बंधुभाव आहे. सध्या अयोध्यावासी खूश आहेत, आम्ही खूश आहोत आणि आमचा समाजही खूश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT