former mp madhu goud yaskhi quarantine stamp at delhi airport hand reaction
former mp madhu goud yaskhi quarantine stamp at delhi airport hand reaction 
देश

क्वारंटाइनच्या शिक्क्यामुळे हाताची झाली अशी अवस्था...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: देशात कोरोना व्हायरसमुळे विमानातून येणाऱया प्रवाशांच्या हातावर क्वारंटाइनचे शिक्के मारले जातात. पण, एका माजी खासदाराच्या हातावर क्वारंटाइनचा शिक्का मारल्यानंतर त्यांच्या हाताला जखम झाली आहे. हाताचे छायाचित्र त्यांनी ट्विटरवरून शेअर केले आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव आणि माजी खासदार मधू गौड याक्षी यांनी ट्वीट करून आपल्या हातावर शिक्का मारल्यामुळे कसा परिणाम झाला याचे छायाचित्र शेअर केले आहे. मधू याक्षी यांच्या हातावर क्वारंटाइनचा शिक्का मारल्यामुळे जखम झाली आहे. मधू याक्षी यांनी याबद्दल केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांना ट्वीटरवर टॅग करून तक्रार केली आहे. 'प्रिय हरदीप सिंह पुरी जी, परदेशातून भारतात आल्यावर विमानतळावर होम क्वारंटाउन होण्यासाठी हातावर शिक्का मारला जात आहे. पण, त्याच्या केमिकलकडे लक्ष द्या, माझ्या हातावर दिल्ली विमानतळावर शिक्का मारण्यात आला होता, पण हातावर त्याचे रिअॅक्शन झाले आहे.'

मधू याक्षी यांनी तक्रार केल्यानंतर केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सुद्धा ट्वीटरवरच उत्तर देताना म्हटले आहे की, 'आपण ही बाब माझ्या लक्षात आणून दिली, त्याबद्दल आपला आभारी आहे. याबद्दल विमानतळ अथॉरिटी ऑफ इंडियाच्या सीएमडीसोबत चर्चा करणार आहे.' दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रवाशांना होम क्वारंटाइन होण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची ओळख व्हावी या हेतूने त्यांच्या हातावर होम क्वारंटाउनचा शिक्के मारले जात आहे. देशात विमान सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे प्रत्येक विमानतळावर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारला जात आहे. निळ्या रंगाचा क्वारंटाइनचा शिक्का मारला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा पुन्हा एकदा 'लाव रे तो व्हिडीओ', सुषमा अंधारेंचा जुना व्हिडीओ दाखवून उद्धव ठाकरेंना सवाल

Nashik BJP News : काँग्रेसला मोठा धक्का! प्रदेश सरचिटणीस डॉ. तुषार शेवाळे यांच्या भाजप प्रवेशाने खळबळ

Raj Thackeray In Thane: 'जोपर्यंत ठाण्यात बाहेरचे लोक आहेत, तोपर्यंत...'; राज ठाकरेंनी पुन्हा उपस्थित केला परप्रांतियांचा मुद्दा

IPL 2024 RCB vs DC Live Score : दिल्लीने आरसीबीला 200 धावांच्या आत रोखले

गोफण | भटकती आत्मा.. ऑफर नव्हे सल्ला! प्रकरण कोर्टात

SCROLL FOR NEXT