Income Tax 
देश

माजी पंतप्रधानांच्या पत्नीला मिळाली 'इन्कम टॅक्स'ची नोटीस!

शेतजमिनीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या चौकशीसाठी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. दैवेगौडा (HD Deve Gawda) यांची पत्नी चिन्नम्मा दैवेगौडा यांना इन्कम टॅक्स (Income Tax) विभागानं नोटीस पाठवली आहे. शेतजमिनीवर मिळणाऱ्या उत्पन्नाच्या संदर्भात त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यांचा मुलगा आणि माजी मंत्री एच. डी. रेवन्ना यांनी ही माहिती दिली. (Former PM Deve Gowda wife gets Income Tax notice)

हसन इथं बोलताना माजी मंत्री रेवन्ना म्हणाले, "इन्कम टॅक्स विभागानं आम्हाला नोटीस पाठवली असून माझ्या आईच्या नावे ही नोटीस आली आहे. आम्ही आमच्या शेतामध्ये ऊसाचं पीक घेतो, हे पाहण्यासाठी इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी इथं येऊन प्रत्यक्ष पहावं. तसेच ड्रोनच्या माध्यमातून या शेतजमिनीचं त्यांनी सर्व्हेक्षण करावं. या जमिनीच्या माध्यमातून माझ्या आई-वडिलांना कोट्यवधींचं उत्पन्न मिळालंय का? आम्ही नवी मालमत्ता खरेदी केली आहे का? एका राजकीय पक्षाला अशा पद्धतीनं टार्गेट का केलं जातंय? असे अनेक सवालही रेवन्ना यांनी उपस्थित केले आहेत.

हसन जिल्ह्यातील दोद्दापुरा आणि पडूवल्लाहिप्पे या दोन ठिकाणच्या दैवेगौडा कुटुंबाच्या मालकीच्या जमिनीसंदर्भात इन्कम टॅक्सनं नोटीस बजावली आहे. या नोटिशीत दैवेगौडा कुटुंबियांच्या मालमत्तांची सखोल माहिती विचारण्यात आली आहे. इन्कम टॅक्सच्या या नोटिशीला आम्ही कायदेशीररित्या उत्तर देणार आहोत, असं रेवन्ना यांनी सांगितलं.

दरम्यान, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि रेवन्ना यांचे बंधू एचडी कुमारस्वामी म्हणाले, आमच्या कुटुंबियांकडून या नोटीसीचा वापर राजकीय हत्यार म्हणून केला जाणार नाही. आमच्या कुटुंबाचे व्यवहार पारदर्शी आहेत त्यामुळं इन्कम टॅक्स विभागाच्या नोटिशीमुळं काळजी करण्याचं कारण नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

SCROLL FOR NEXT