देश

काँग्रेसला मोठा दणका; प्रणव मुखर्जींचे पुत्र 'तृणमूल'मध्ये

विनायक होगाडे

कोलकता : दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Former President Pranab Mukherjee) यांचे पुत्र अभिजित (Abhijit Mukherjee) यांनी सोमवारी काँग्रेसला (Congress) सोडचिठ्ठी देऊन पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमध्ये (Trinamool Congress) प्रवेश केला. अभिजित यांनी पत्रकार परिषद घेतली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राष्ट्रीय राजकारणात आणखी मोठी भूमिका बजावू शकतील असे त्यांनी सूचित केले. ते म्हणाले की, ममता यांनी अलीकडेच भाजपची जातीयवादी लाट ज्या पद्धतीने थोपविली ते पाहता इतरांच्या मदतीने संपूर्ण देशात तसे करणे त्यांना शक्य होईल. (Former President Pranab Mukherjee son Abhijit Mukherjee joins Trinamool Congress)

काँग्रेस सोडण्याच्या निर्णयाबद्दल ते म्हणाले की, प्रमुख सदस्यत्व सोडले तर मला पक्षाच्या कोणत्याही समितीत किंवा पदावर घेण्यात आले नाही. त्यामुळे एक सैनिक म्हणून तृणमूलमध्ये दाखल होण्याचा निर्णय मी घेतला. तृणमूलच्या सूचनांनुसार मी कार्य करेन. एकात्मता आणि धर्मनिरपेक्षता कायम राखण्यासाठी मी झटेन. काही महिन्यांपूर्वी जितीन प्रसाद यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. अभिजित यांचे त्यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. ते काँग्रेस संसदीय पक्षात सहकारी होते. दिवंगत प्रणव मुखर्जी यांचे जितीन तसेच त्यांचे पिता जितेंद्र प्रसाद यांच्याशी आपुलकीचे संबंध होते. अभिजित यांनी पित्याच्या जांगीपूर मतदारसंघातून दोन वेळा खासदारकीची निवडणूक जिंकली. मागील निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला. दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी तृणमूलमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते अशी ओळख असलेले नेते आणि ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांची भेट घेतली होती. आपल्याला काय वाव असेल याविषयी त्यांनी चर्चा केली होती.

काँग्रेसला आणखी एक हादरा

अभिजित मुखर्जी यांनी पक्ष सोडल्यामुळे काँग्रेसला आणखी एक हादरा बसला आहे. गेल्या काही वर्षांत ज्योतिरादित्य शिंदे, जितीन प्रसाद, हिमंता बिस्व सरमा अशा काही प्रमुख नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्या तुलनेत अभिजित यांचा ताकदवान नेते असा लौकिक नसला तरी पश्चिम बंगाल काँग्रेसची स्थिती आणखी कमकुवत झाली आहे. अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. इतिहासात प्रथमच त्यांच्यावर भोपळा मिळण्याची नामुष्की आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; लागोपाठ स्फोट अन्...

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ; नेमक्या कशा धावणार गाड्या..

SCROLL FOR NEXT