Devisingh Shekhawat Demise 
देश

Devisingh Shekhawat Demise: माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे पुण्यात निधन

माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे पती श्री देवीसिंह शेखावत (वय 89) यांचे आज पुण्यात निधन झाले.

सकाळ डिजिटल टीम

माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे आज निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Devisingh Shekhawat Demise)

दोन दिवसांपूर्वी, हृदयविकाराचा धक्का आल्याने देवीसिंह शेखावत यांना पुण्यात केईएम हॉस्पिटलला दाखल केले होते. आज सकाळी 9.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आज सायंकाळी 6 वाजता त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.

शेखावत राजकारणात सक्रिय होते. त्यांनी आमदार म्हणूनही काम पाहिलं आहे. देवीसिंह शेखावत यांचा 7 जुलै 1965 रोजी प्रतिभा पाटील यांच्यासोबत विवाह झाला होता. देवीसिंह शेखावत हे अमरावती शहराचे पहिले महापौर होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते.

सुरुवातीच्या काळात देवीसिंह शेखावत यांनी रसायन शास्त्राचे प्राध्यापाक म्हणून काम पाहिलं होतं. 1972मध्ये मुंबई विद्यापीठाने त्यांना पीएचडी दिली होती. विद्या भारती शिक्षण संस्था या त्यांच्या संस्थेचे ही ते काम पाहत होते. त्यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून झाली.

अमरावतीचे महापौर ते आमदार आदी पदे त्यांनी भूषविली आहेत. मात्र, 1995च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला होता. या निवडणुकीत त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं.

देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पती आणि माजी आमदार रावसाहेब शेखावत यांचे ते वडील होत. डॉ. देवीसिंह रामसिंह शेखावत यांचा जन्म १९ एप्रिल १९३४ मध्ये चंद्रपूर (खल्लार, जिल्हा अमरावती) येथे झाला.

त्यांनी रसायनशास्त्र  विषयामध्ये एम.एस्सी आणि हापकीन इन्स्टिट्यूटमधून पीएच.डी. केली. अमरावती महानगरपालिकेचे ते पहिले महापौर होते. डॉ. शेखावत यांनी जळगाव आणि अमरावतीमध्ये अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांची निर्मिती केली. महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती पुरस्काराने क्रिकेट क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना गौरविले आहे.

त्यांनी नागपूर विद्यापीठाचे कार्यकारी सभासद आणि आदिवासी संशोधन संस्था, पुणे यांचे कार्यकारी सदस्य म्हणून काम पाहिले. श्री शिवाजी सायन्स कॉलेजचे (अमरावती) प्राध्यापक, विद्याभारती डिग्री कॉलेजचे (अमरावती) प्राचार्य, साधना कृषी विज्ञान केंद्राचे (बडनेरा, दर्यापूर) संचालक, तसेच विद्याभारती शैक्षणिक मंडळाचे चेअरमन अशी पदेही त्यांनी भूषविली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT