देश

काँग्रेसचे चार मंत्री राजीनामा देणार?

वृत्तसंस्था

बंगळूर : राज्यातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल सरकार वाचविण्यासाठी कॉंग्रेसने काही योजना हाती घेतल्या आहेत. काही असंतुष्ट आमदारांना मंत्रिपद देण्याची ग्वाही देण्यात आली असल्याचे समजते. त्यासाठी चौघा पक्षनिष्ठ व वरिष्ठ कॉंग्रेस मंत्र्यांना राहुल गांधी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची सूचना केली आहे. 

कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी कर्नाटकातील राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. राज्य कॉंग्रेसचे प्रभारी के. सी. वेणुगोपाल यांच्याकडून त्यांनी सविस्तर माहिती घेतली. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्याशीही त्यांनी मंगळवारी (ता. 15) सायंकाळी सविस्तर चर्चा केली. कोणत्याही परिस्थितीत सरकार वाचविण्याची गरज असल्याचे वेणुगोपाल यांना बजावून असंतुष्ट आमदारांशी चर्चा करण्याची राहुल गांधी यांनी सूचना केली होती.

विद्यमान चार मंत्र्यांनी औदार्य दाखवून राजीनामा द्यावा व असंतुष्ट आमदारांची त्या जागी वर्णी लावण्यास त्यांनी सुचविले असल्याचे समजते. हगरीबोम्मनहळ्ळीचे भीमा नायक, मस्कीचे प्रतापगौड पाटील, बळ्ळारी ग्रामीणचे नागेंद्र, मूळबागीलूचे एच. नागेश यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याचे नियोजन आहे. 

राजीनाम्याची तयारी असलेले मंत्री 

सरकार वाचविण्यासाठी मंत्रिपदाचा त्याग करण्याची तयारी चार वरिष्ठ मंत्र्यांनी दाखविली आहे. त्यामध्ये के. जे. जॉर्ज, डी. के. शिवकुमार, कृष्ण बैरेगौडा, प्रियांक खर्गे यांचा समावेश आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT