Modi OLX 
देश

OLX वर विकायला काढलं PM मोदींचे संसदीय कार्यालय; चार जणांना अटक

सकाळवृत्तसेवा

वाराणसी : आपले जुने सामान खरेदी-विक्री करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या OLX या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संसदीय कार्यालयच विकायला निघालेल्या चार व्यक्तींना पोलिसांनी शुक्रवारी सकाळी अटक केली. वाराणसीमधील जवाहरनगरमधील पंतप्रधान मोदींचं संसदीय कार्यालयाच्या विक्री संदर्भातील एक पोस्ट OLX या प्लॅटफॉर्मवर टाकण्यात आली होती. यासंदर्भात पोलिसांनी आज शुक्रवारी सकाळी चार व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे. या चारी व्यक्तींची भेलूपुर पोलिस ठाण्यात चौकशी केली जात आहे. पोलिसांच्या सांगण्यानुसार, लवकरच या प्रकरणाचा खुलासा केला जाईल.

OLX वर पंतप्रधान मोदींच्या संसदीय कार्यालयाच्या फोटोसोबत साडेसात कोटी रुपयांमध्ये त्याची विक्री करण्याची जाहिरात टाकली गेली होती. याठिकाणी विक्रेता म्हणून लक्ष्मीकांत ओझा यांचं नाव लिहलं होतं. जाहीरातीत असंदेखील नमूद करण्यात आलं होतं की हाऊसेज एँड विला, चार बेडरुम-बाथरुम, बिल्ड अप एरिया 6500 स्क्वेअर फूट, दोन मजली भवनात दोन कार पार्किंग सोबतच नॉर्थ-ईस्ट फेसिंग आहे. यासोबत प्रोजक्टचं नाव पीएमओ कार्यालय वाराणसी असं लिहलं गेलं होतं.

गुरुवारी सोशल मीडियावर ही जाहीरात व्हायरल होऊ लागली. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी संध्याकाळी OLX वरुन ती पोस्ट डिलीट केली. यासंदर्भात शुक्रवारी सकाळी एसएसपी अमित पाठक यांनी सांगितलं की OLX द्वारे मिळालेल्या माहितीनुसार, भेलूपुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोबतच मोबाईल नंबरच्या मदतीने चार लोकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली गेली आहे. लवकरच चार लोकांच्या अटकेची माहिती दिली जाईल, असंही पोलिसांनी म्हटलं आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT