Four people killed 10 injuried during Moharram procession Tazia came in contact with high-tension electric wire  
देश

Moharram Procession : मोहरमच्या मिरवणुकीत मोठा अपघात! विजेचा शॉक लागून चौघांचा मृत्यू, १० जण भाजले

रोहित कणसे

झारखंड मधील बोकारो जिल्ह्यातील पीतेरवार ब्लॉकमधील खेतको गावात आज मोहरमच्या मिरवणुकीत मोठा अपघात झाला आहे. मिरणणुकीदरम्यान ताजियाचा विद्युत तारेशी संपर्क आल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर 10 जण भाजल्याने गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान बोकारोचे पोलीस अधीक्षक प्रियदर्शी आलोक यांनी सांगितले की, राज्याची राजधानी रांचीपासून सुमारे 80 किमी अंतरावर असलेल्या पेटारवार पोलीस स्टेशन हद्दीतील खेतको गावात एका धार्मिक ध्वजाचा विद्युत तारेशी संपर्क आल्याने हा अपघात झाला. शनिवारी सकाळी सहा वाजता लोक मोहरमच्या मिरवणुकीच्या तयारीत असताना ही घटना घडली

लोखंडी रॉड तारेच्या संपर्कात आल्याने अपघात

पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, लोकांच्या हातात धार्मिक ध्वज होता, ज्याची काठी लोखंडाची होती. हा ध्वज 11,000 व्होल्टच्या हाय-टेन्शन इलेक्ट्रिक वायरच्या संपर्कात आला. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, यापैकी 8 जणांना बोकारो जनरल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले, जिथे 4 जणांचा मृत्यू झाला आणि 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. काही दिवसांपूर्वी बिहारच्या गोपालगंजमध्ये अशीच एक दुर्घटना घडली होती, ज्यात एकूण 11 जण दगावले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT