death death
देश

टाकीत गुदमरून चार मजुरांचा मृत्यू; रुग्णालयाबाहेर पोलिस बंदोबस्त

सकाळ डिजिटल टीम

राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील टाकीत गुदमरून चार मजुरांचा मृत्यू (death) झाला. जिल्ह्यातील बिचवल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करणी औद्योगिक परिसरात हा भीषण अपघात घडला. लालचंद, काळूराम, चोरुलाल व कृष्णा राम अशी मृतांची नावे आहेत. टाकीत कार्बन डायऑक्साईड राहिल्याचे मजुरांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, लोकर बनवण्यासाठी वापरण्यात येणारे धागे धुण्यासाठी अनेक प्रकारची रसायने वापरली जातात. त्याचे पाणी या टाकीत जाते. हे पाणी स्वच्छ करण्यासाठी कारखाना मालकाने बाहेरून तीन मजूर बोलावले होते. टाकी साफ करण्यासाठी एक मजूर उतरला. बराच वेळ कामगाराचा आवाज न आल्याने त्याचे आणखी दोन साथीदार टाकीत उतरले. त्याचाही गुदमरून मृत्यू झाला. यानंतर कृष्णराम तिघांना वाचवण्यासाठी खाली उतरला. त्याचाही मृत्यू (death) झाला.

एका मागून एक चार मजूर टाकीत उतरले आणि मरण पावले. टाकीमध्ये चार मजूर बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे स्थानिक लोकांनी पाहिले. मजुरांना बाहेर काढून पीबीएम रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर पोलिस-प्रशासनात खळबळ उडाली आहे. रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बिकानेरच्या बिचवल भागातील करणी औद्योगिक क्षेत्रातील लोकर कारखान्यात गॅस गळतीच्या घटनेत चार कामगारांचा मृत्यू अत्यंत दुःखद आहे. देव त्यांच्या कुटुंबीयांना हे नुकसान सहन करण्याची शक्ती देवो. दिवंगत आत्म्याला शांती लाभो, असे ट्विट मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Digital India Reel Contest: Big News : ...तर ‘Reel’ बनवणाऱ्यांना मिळवता येणार सरकारकडून १५ हजार रुपये!

Love Story : शूटिंगदरम्यान झाली मैत्री, दहा वर्षांचं डेटिंग आणि लग्न; रितेश-जिनिलियाची भन्नाट गोष्ट

Power Supply: कल्याणमध्ये विजेचा खेळखंडोबा, महावितरणावर ठाकरे गट आक्रमक, आंदोलनाचा इशारा

Jalgaon News : जळगावात सरकारी कामात अडथळा; कारवाई टाळण्यासाठी अधिकार्‍यांवर दबाव

Katraj Zoo : राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात १६ हरणांचा मृत्यू; वन्यजीवप्रेमींमध्ये चिंतेचं वातावरण; तपासासाठी नमुने प्रयोगशाळेत

SCROLL FOR NEXT