four year old boy pushing stretcher at hospital at up video viral 
देश

रुग्णालयात चिमुकल्यावर आली स्ट्रेचर ढकलण्याची वेळ...

वृत्तसंस्था

लखनौ (उत्तर प्रदेश): एक चार वर्षांचा मुलगा रुग्णालयात स्ट्रेचर ढकलत असल्याचे छायाचित्र आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, आरोग्य विभागाचे तीन-तेरा वाजल्याच्या प्रतिक्रिया नेटिझन्स नोंदवत आहेत. कोरोनाच्या संकटात रुग्णालयातील धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

एका चार वर्षांच्या चिमुकल्यावर आपल्या आईसह रुग्णालयात स्ट्रेचर ढकलण्याची वेळ आली आहे. कारण, संबंधित रुग्णालयात स्ट्रेचवरून नेण्यासाठी पैसे द्यावे लागतात. आणि हे कुटुंब गरीब असल्यामुळे त्यांच्याकडे पैसे नाहीत. पैसे नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनाच स्ट्रेचर ढकलावा लागत आहे. देवरिया जिल्ह्यातील एका रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला खाडकन जागे झाले आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 'बिंदू यादव आणि त्यांचा चार वर्षांचा मुलगा स्ट्रेचर ढकलताना दिसत आहे. बिंदू यांच्या साठ वर्षीय वडिलांना काही लोकांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत वडिलांच्या हात-पायांना दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना जिल्ह्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका वॉर्डमधून ड्रेसिंग करून घेण्यासाठी त्यांना जावे लागते. मात्र, याच वेळी स्टेचर खेचण्यासाठी रुग्णालयातील कर्मचारी पैशाची मागणी करतात. गरीब असल्याने आमच्याकडे पैसे नाहीत त्यामुळे मी आणि माझा चार वर्षाचा मुलगा स्ट्रेचर ओढल्याची माहिती महिलेने दिली आहे.'

दरम्यान, बिहारच्या सिवान जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. रुग्णालयाबाहेर एक महिला भर पावसात कित्येक तास जमिनीवर पडून होती. मात्र, कोणीही तिच्या मदतीसाठी पुढे आले नाही. एका ट्विटर युजरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या धक्कादायक घटनेचे काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यानंतर ही घटना समोर आली रुग्णालयाबाहेर जमिनीवर पडून असलेल्या या महिलेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. ही घटना वेगाने पसरल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने महिलेला रुग्णालयात दाखल करून घेतले. तसेच तिच्यावर उपचार सुरू केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT