cyber crime 
देश

सावधान! एका कॉलमुळे रिकामं होतंय बँक खातं; सरकारने दिला इशारा

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - मोबाइलवर येणाऱ्या कॉल्सवरून फसवणूक करण्याचा प्रकार तसा जुनाच आहे. पण आता पुन्हा एकदा नव्यानं सायबर हल्ले करणाऱ्यांनी याचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. कॉल करून बँक खात्यातून रक्कम काढण्याचे प्रकार समोर येत आहेत. भारत सरकारने गृहमंत्रालयाच्या सायबर सिक्युरिटी ट्विटर हँडलवरून युजर्सना इशारा दिला आहे. सरकारने युजर्सना फेक कॉलबाबत सावध केलं आहे. 

CyberDost ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे. यामुळे युजर्सना फसवणुकीपासून सुरक्षित राहता येईल. फसवणूक करण्यासाठी येणाऱ्या कॉलमध्ये सर्वाधिक कॉल +92 पासून सुरू होतात. अशा नंबरवरून नॉर्मल कॉलशिवाय युजर्सना व्हॉटसअॅप कॉल्स केले जात आहेत. कॉल्सचा उद्देश युजर्सची खासगी आणि संवेदनशील माहिती चोरण्याचा असतो. तसंच कॉल करणारे समोरच्याला बोलण्यात गुंतवून डिटेल्स चोरी करतात. 

कॉल करताना लोकांच्या बँक अकाउंट नंबरपासून डेबिट कार्डपर्यंतची माहिती घेतली जाते. यासाठी त्यांना लॉटरी जिंकल्याचं किंवा लकी ड्रॉमध्ये नाव आल्याचं प्रलोभन दाखवलं जातं. त्याची रक्कम पाठवण्यासाठी बँकेची माहिती द्या असं म्हणतात. फसवणूक करणारे मोठ्या कंपन्यांची नावे सांगून युजर्सचा विश्वास बसेल असं बोलतात. 

तुम्हाला अनेकदा कॉल केल्यानंतर क्यूआर कोड किंवा इतर कोड पाठवण्यास सांगू शकतात. चुकूनही असा कॉल्सला रिप्लाय देऊ नका. फसवणूक करणारे एकापेक्षा अधिक क्रमांकावरून फोन करू शकतात. याशिवाय +01 ने सुरु होणाऱ्या नंबर्सवरून अनेक युजर्सना कॉल आले आहेत. असे कॉल आल्यास सावध रहा आणि तुमच्या बँकेची माहिती देणं टाळा असं सरकारने सांगितलं आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election 2025: पुण्यातल्या भाजप-शिवसेना युतीची इनसाईड स्टोरी; 'त्या' 15 जणांची नावं आली समोर, शिवसेनेने 140 एबी फॉर्म वाटले

Sassoon Hospital : आईच्या किडनीदानातून मुलाला नवे जीवन; ससून रुग्णालयामध्ये ३५ वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया!

Maharashtra Teacher Recruitment : आता शिक्षक भरतीची प्रक्रिया 'परीक्षा परिषदेमार्फतच' होणार; उमेदवारांकडून तीव्र नाराजी व्यक्त!

India Economy: गुड न्यूज! भारत बनला जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकलं मागे, GDP किती?

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT