Rahul Gandhi, Narendra Modi 
देश

'फ्रेन्ड्स'चं थीम साँग अन् निशाणा; राहुल गांधींच्या मोदींना 'फ्रेन्डशिप डे'च्या शुभेच्छा

इन्स्टाग्रामवरुन राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : जगभरात साजऱ्या होत असलेल्या आजच्या 'फ्रेन्डशिप डे' निमित्त काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खोचक शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधी यांनी आपल्या इन्स्टाग्रामवरुन रविवारी एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये पतंप्रधान नरेंद्र मोदी काही बड्या उद्योगपतींसोबतच्या मैत्रीचा व्हिडिओ शेअर करत त्यांना 'फ्रेन्डशिप डे'च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करताना राहुल गांधी यांनी त्याला कॅप्शन दिलंय "हम दो हमारे दो की सरकार" यामध्ये फ्रेन्ड्स या प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही मालिकेच्या थीम साँगचा वापर करण्यात आला आहे. सरकारच्या 'हम दो हमारे दो' या घोषणेवरुन राहुल गांधी यांनी निशाना साधताना. देश केवळ चार लोकच चालवत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

या वर्षी फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पादरम्यान कुटुंब नियोजनाबाबत असलेल्या 'हम दो हमारे दो' या घोषणेचा वापर करत कृषी कायद्यांना विरोध करताना आता देश चार व्यक्ती चालवत आहेत, असा आरोप केला होता. हे चाल लोक कोण आहेत हे सर्वांना माहिती आहे, असंही राहुल गांधी म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT