देश

इंधन दरवाढीचा भडका, मुंबईत पेट्रोल 91 रुपयांवर

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली (पीटीआय) : देशभरात इंधन दरवाढीचा भडका कायम असून, सोमवारी मुंबईत पेट्रोलने 91 रुपयांची पातळी ओलांडली. याचबरोबर आजपासून स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडची दरवाढ झाली असून, तो प्रथमच पाचशे रुपयांवर गेला आहे. 

पेट्रोलच्या दरात आज प्रतिलिटर 24 पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 30 पैसे वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर 83.73 रुपये आणि डिझेलचा दर 75.09 या आतापर्यंतच्या ऐतिहासिक विक्रमी पातळीवर पोचला. मुंबईत पेट्रोलचा दर आज 91.08 रुपये आणि डिझेल 79.72 रुपयांवर गेले. मुंबईत पेट्रोलने आज 91 रुपयांची पातळी ओलांडली. यावर्षी डिसेंबरअखेरीस पेट्रोलचा दर शंभर रुपयांवर जाईल, अशी शक्‍यता तज्ञ व्यक्त करीत आहेत. 

स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरातही आजपासून वाढ झाली. अंशदानित गॅस सिलिंडरच्या दरात 2.89 रुपये वाढ करण्यात आली असून, तो 502 रुपयांवर गेला आहे. याचबरोबर विनाअंशदानित गॅस सिलिंडरच्या दरात 59 रुपये वाढ करण्यात आली असून, तो 879 रुपयांवर गेला आहे. गॅस सिलिंडरच्या दरातील ही सलग पाचव्या महिन्यांतील दरवाढ आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये ग्राहकांना प्रतिसिलिंडर 320.49 रुपये अंशदान मिळत होते. आता ऑक्‍टोबरमध्ये हे अंशदान 376 रुपये झाले आहे. 

ऑगस्टच्या मध्यापासून वाढ 
(प्रतिलिटर रुपये) 
पेट्रोल : 6.59 
डिझेल : 6.37 

अंशदानित गॅस सिलिंडर 
मे : 491.21 रुपये 
ऑक्‍टोबर : 502.40 रुपये 

खनिज तेलाचा भाव 
प्रतिबॅरल : 83.27 डॉलर 

इंधन दरवाढीची कारणे 
- आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाची भाववाढ 
- डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण 
- केंद्र व राज्य सरकारच्या करांचा मोठा बोजा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT