lalu prasad yadav sakal media
देश

इंधन ५० रुपयांनी स्वस्त झालं असतं तर तो दिलासा असता - लालू यादव

"उत्तर प्रदेशच्या निवडणुकीनंतर इंधनाच्या किंमती पुन्हा वाढतील"

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : केंद्र सरकारने दिवाळीच्या तोंडावरच पेट्रोल-डिझेलचे दर कमी केल्यानंतर हा सरकारचा राजकीय निर्णय असल्याची टीका विरोधीपक्षांकडून केली जात आहे. त्यातच राष्ट्रीय जनता दलाचे सर्वोसर्वा लालू प्रसाद यादव यांनी देखील केंद्रावर निशाणा साधला. उत्तर प्रदेशच्या निवडणुका झाल्यानंतर इंधनाच्या किंमती पुन्हा वाढतील असंही त्यांनी म्हटलं आहे.

इंधनाचे दर कमी करण्याचा केंद्राचा निर्णय हा तात्पुरता असून पुढील वर्षी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानतंर पुन्हा इंधनाचे दर वाढतील, असं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे. ५ रुपयांनी पेट्रोल स्वस्त करत मोदी सरकार नाटक करत आहे. जर पेट्रोलच्या किंमती ५० रुपयांनी कमी झाल्या असत्या तर तो जनतेसाठी दिलासा झाला असता, असंही ते म्हणाले.

केंद्र सरकारनं बुधवारी उत्पादन शुल्कात कपात करत पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल १० रुपयांनी स्वस्त केलं. तसेच राज्यांनाही व्हॅट कमी करण्याचं आवाहन केलं. त्यानंतर देशातील ९ भाजपशासित राज्यांनी तसेच ओडिशा सरकारनं व्हॅटमध्ये कपात केली.

दरम्यान, केंद्राच्या या निर्णयानंतर राजदचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही यावर भाष्य केलं. पेट्रोलचे दर ७० रुपये प्रतिलिटरपेक्षा कमी व्हायला हवेत अशी मागणी त्यांनी केली. कारण सत्तेत येणाऱ्यापूर्वी भाजपनं पेट्रोल ७० रुपये प्रतिलिटर असताना ते खूपच महाग असल्याचं म्हटलं होतं आणि आता सत्तेत आल्यानंतर त्यांनीच पेट्रोल १०० रुपयांपार नेलं आहे. त्यामुळं पेट्रोलचे दर ७० रुपयांच्याखाली असावेत असं तेजस्वी यादव म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: 500 च्या जळलेल्या नोटा कुणाच्या होत्या? Justice Yashwant Varma Cash कांडाची पूर्ण Timeline

Mumbai High Court Order : जयगड बंदरातील आमिराती गॅसवाहू जहाजाबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय; साडेनऊ कोटी भरा, नाहीतर गॅस रिकामा करा!

Pune Tunnel: पुण्यात आणखी एक बोगदा! सुतारदरा ते पाषाण भुयारी मार्गासाठी लवकरच सल्लागार नियुक्त, महापालिकेचा मोठा प्लॅन

Latest Marathi News Live Update : पुण्यात वारजे कर्वेनगर भागात पडलेल्या प्रचंड खड्डे दुरुस्ती साठी मनसे तर्फे वारजे क्षेत्रीय प्रमुखांना तुकाराम मुंडे यांची प्रतिमा भेट

Gokul Election Update : 'गोकुळ'ची बहुचर्चित प्रारूप मतदार यादी जाहीर; 4,897 संस्थांना मतदानाचा हक्क, 'इतक्या' संस्थांना बसला फटका!

SCROLL FOR NEXT