सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण sakal
देश

पूर्ण चौकशी झाल्याशिवाय कुणावरही आरोप करणार नाही : चव्हाण

अमरावती दंगल प्रकरणी काँग्रेसने भाजपवर केले असले, तरी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपवर आरोप करणे टाळले आहे.

संतोष शाळिग्राम

नवी दिल्ली : अमरावती दंगल प्रकरणी काँग्रेसने भाजपवर केले असले, तरी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपवर आरोप करणे टाळले आहे. ही दंगल महाराष्ट्रासाठी गंभीर बाब असली, तरी मी पूर्ण चौकशी झाल्याशिवाय कुणावरही आरोप करणार नाही, अशी भूमिका चव्हाण यांनी घेतली. अशोक चव्हाण यांनी आज‌ सायंकाळी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

देगलूर विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार जितेश अंतापूरकर यांची केंद्रीय नेत्यांशी उद्या भेट घडवणार आहोत. त्यासाठी दिल्लीत आल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचीही भेट घेणार असल्याचेही ते म्हणाले. नांदेड ते हैदराबाद ग्रीन फिल्ड प्रोजेक्ट आणि रस्ता या संदर्भात चर्चा केली आहे, असे सांगताना औरंगाबाद-पुणे या रस्त्याबाबत चर्चा केली. मराठवाड्यातील बुलेट ट्रेन संदर्भात विनंती केली. ते या प्रकल्पांबाबत सकारात्मक आहेत, असे चव्हाण यांनी सांगितले.

विधान परिषदेच्या एक जागेसाठी प्रज्ञा सातव यांची उमेदवारी जाहीर केली आहे. ही जागा आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढवत आहोत. त्यामुळे कोणत्याही स्थितीत जिंकणार यात शंका नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नवाब मलिक आणि भाजप वादावरून ते म्हणाले, "राजकारणाचा स्तर घसरू नये. व्यक्तीगत वैर असल्यासारखे कुणी वागू नये. पण कुणी आरोप केला, तर उत्तर द्यावे लागेल.

अमरावतीच्या दंगलीच्या घटना ही महाराष्ट्रासाठी गंभीर बाब आहे. या गोष्टी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करावी लागते. म्हणून कारवाई केली. या प्रकरणी मला कुणावरही आरोप करायचे नाही. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्याशिवाय मी यावर काहीही बोलणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मुख्यमंत्री पदाचा कार्यभार कुणाकडे, याबाब विचारले असता, मुख्यमंत्री दोन तीन दिवसांत सेवेत रुजू होतील. या काळात त्यांनी पदाचा कार्यभार कुणाकडे देण्याचा प्रश्न नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

पंडित नेहरूंच्या जयंती दिनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सत्ताधारी नेते उपस्थित नाही, यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. देशाचे पहिल्या पंतप्रधानांबाबत अशी घटना घडली नाही, पण आता ही नवी परंपरा या सरकारने सुरू केली आहे, अशी टीका त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EV Policy: पेट्रोल-डिझेल वाहनांना झटका! दिल्लीत नवे EV धोरण लागू; सरकार भरघोस प्रोत्साहन देणार, काय फायदा होणार?

NASA: पृथ्वीच्या दिशेने वेगाने येतंय 'ब्रह्मास्र'! विनाश वाचवण्यासाठी 'नासा' करतंय ३० हजार कोटींचा खर्च, इतिहासातली पहिलीच घटना

Mumbai News: सहा महिने पोटदुखी, पण हिमोग्लोबिनची कमतरता मानून दुर्लक्ष; नंतर 21 वर्षीय तरुणीच्या तपासणीत धक्कादायक सत्य समोर आलं

Latest Marathi News Live Update : राष्ट्रीय महामार्गाला ओढ्याचं स्वरुप, अभियंत्याचा मृत्यू

Heritage Tourism: जुन्या वाड्यांना मिळणार पर्यटनाचा नवा चेहरा! सरकार देणार ४० कोटींपर्यंत अनुदान आणि करसवलतींचा लाभ, काय आहे योजना ?

SCROLL FOR NEXT