Mukhtar Ansari  esakal
देश

Mukhtar Ansari : अन्सारीचा बंदोबस्तात दफनविधी

स्थानिक प्रशासनाने अन्सारीचे निवासस्थान आणि स्मशानभूमी परिसरात कडक बंदोबस्त ठेवला होता.

सकाळ डिजिटल टीम

गाझीपूर/लखनौ : कुख्यात गुंड आणि नेता मुख्तार अन्सारी याच्यावर आज गाझीपूरच्या कालीबाग येथे अन्सारी कुटुंबीयांच्या मालकीच्या मैदानात दफनविधी करण्यात आला. यावेळी गर्दी होती आणि घोषणाबाजीचा प्रकारही घडला. स्थानिक प्रशासनाने अन्सारीचे निवासस्थान आणि स्मशानभूमी परिसरात कडक बंदोबस्त ठेवला होता.

मुख्तार अन्सारी याचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, अन्सारीचा पार्थिव शुक्रवारी मध्यरात्री त्याच्या घरी आणण्यात आला आणि त्यानंतर घरीच दफनविधीपूर्वीचे विधी पार पाडले. त्याच्या अंत्ययात्रेत त्याचा मोठा भाऊ खासदार अफजल अन्सारी, मुलगा उमर अन्सारी, पुतण्या आमदार सुहेब अन्सारी, कुटुंबातील अन्य सदस्य आणि समर्थक सामील झाले होते. यावेळी काही समर्थकांनी घोषणाबाजी केली. स्मशानभूमित अंत्ययात्रा पोचल्यानंतर अफजल अन्सारीने शांतता बाळगण्याचे आवाहन केले.

त्याचा मोठा भाऊ माजी आमदार सिबगतुल्लाह अन्सारी देखील हजर होता. मात्र मोठा मुलगा आणि आमदार अब्बास अन्सारी हा तुरुंगात असल्याने दफनविधीला उपस्थित राहू शकला नाही. तो अनेक गुन्ह्याखाली कासगंज तुरुंगात आहे. दरम्यान, गाझीपूरच्या जिल्हाधिकारी आर्यका अखौरी यांनी मुख्तार अन्सारी याच्या अंत्ययात्रेच्या वेळी दिलेल्या घोषणांची गंभीर दखल घेतली असल्याचे सांगितले. घोषणाबाजी करणाऱ्यांची ओळख पटविली जाईल आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई होईल, असे सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : वारजेत एका व्यक्तीकडून जिवंत काडतुसे आणि पिस्तुल जप्त

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT