Dadar टीम ईसकाळ
देश

कुठे आहे जमावबंदी? दादरची गर्दी पाहिलीत का?

दादरच्या भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टंसिंगचा फज्जा

सकाळ डिजिटल टीम

दिवसेंदिवस कोरोनाची रूग्ण संख्या उच्चांक पातळी गाठत आहे. त्यात मुंबईकोरोनाचा कहर सुरूच आहे. अशात मुंबईतील दादरची गर्दी तुम्ही पाहिलीत का? जर तुम्ही दादरच्या भाजी मार्केट मधील गर्दी पाहाल तर तुमचे होश उडेल. आज सकाळी दादर येथे भाजी मार्केट मध्ये सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला दिसून आला. मुंबईत जिथे एकीकडे कोरोना झपाट्याने वाढतोय तर दुसरीकडे कोरोनाचे नियम तेथील नागरिक धाब्यावर उडवीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

गेल्या २४ तासात मुंबईत १०,६६१ नवे रुग्ण आढळले असून तर ११ जणांचा मृत्यू झालाय तर सध्या मुंबईत एकूण ७३,५१८ सक्रिय रुग्ण आहेत. विशेष म्हणजे गेल्या 24 तासांत मुंबईत 81 पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत. कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता मुंबईत जमावबंदी असतानासुध्दा मुंबईकर कोरोनाचे नियम पाळत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे याचा परिणाम वाढत्या रुग्णसंख्येवर दिसणारच.

दादरच्या भाजी मार्केटची गर्दी पाहता प्रशासनाने यावर ठोस पावले उचलावीत आणि वेळीच गर्दीवर आळा घालावा तरच कुठेतरी कोरोना रुग्णसंख्या वाढायच्या थांबतील. अन्यथा अशीच गर्दी कायम राहली तर राज्यात लवकरच लॉकडाऊन होणार कि काय, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT