sonia gandhi and rahul gandhi  sakal
देश

‘जी-२३’ गटाच्या नेत्यांची आपल्या बैठकीनंतर सोनियांशी भेट; 'अशी' झाली चर्चा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : सामूहिक नेतृत्वाची मागणी करणाऱ्या असंतुष्ट नेत्यांच्या जी-२३ गटाला चुचकारण्याचा प्रयत्न काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींकडून सुरू आहे. याअंतर्गत आज या गटाचे नेते आणि राज्यसभेतील काँग्रेसचे उपनेते मनीष तिवारी, विवेक तनखा तर लोकसभेतील खासदार मनीष तिवारी आज सोनिया गांधींना भेटले. (Sonia Gandhi)

काँग्रेस कार्यकारिणीतील सदस्यांची निवडणूक व्हावी, निवडणूक समिती आणि संसदीय मंडळ तयार केले जावे, जेणेकरून पक्षातील महत्त्वाचे निर्णय एकतर्फी पद्धतीने होण्याऐवजी सर्वांच्या सल्लामसलतीनंतरच व्हावेत, असा आग्रह धरणाऱ्या जी-२३ गटाच्या नेत्यांची गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थान झालेली प्रदीर्घ बैठक, त्यानंतर हरियानाचे मुख्यमंत्री भूपिंदर हुडा यांची राहुल गांधींसमवेत झालेली बैठक आणि गुलाम नबी आझाद आणि सोनिया गांधी यांची झालेली बहुचर्चित भेट, या पार्श्वभूमीवर आजची भेट महत्त्वाची मानली जात आहे. जी-२३ गटाचे बंड शांत करण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाने या गटातील नेत्यांना कार्यकारिणीमध्ये तसेच संसदीय मंडळामध्ये सामावून घेण्याची तयारी चालविल्याचे समजते. त्या प्रक्रियेअंतर्गत सुरू झालेल्या सल्लामसलतीचा भाग म्हणून ही भेट असल्याचे सांगितले जाते. (Sonia Gandhi)

राहुल गटावर नाराजी
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवानंतर पक्ष नेतृत्वावर, विशेषतः राहुल गांधींच्या कार्यपद्धतीविरोधात असंतुष्ट नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राहुल यांचे विश्वासू अजय माकन, के. सी. वेणुगोवाल, रणदीप सुरजेवाला हेदेखील जी-२३ गटाच्या नाराजीचे कारण बनले आहेत. जी-२३ गटाने पक्षामध्ये सर्वसमावेशक तसेच सामुहिक नेतृत्वाची मागणी सुरू केली आहे. राज्याच्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करताना सामूहिक निर्णय व्हावा, समविचारी पक्षांशी आघाडी करण्याच्या धोरणात्मक प्रक्रियेमध्ये वरिष्ठ नेत्यांचा सहभाग असलेली यंत्रणा तयार केली जावी, अशीही मागणी या गटाची आहे. (Sonia Gandhi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT