PM Modi Criticizes on Congress on the issue of Emergency 
देश

PM Modi on Health Emergency: "आगामी आरोग्य आणीबाणीसाठी तयार राहा"; PM मोदींनी का केलंय हे आवाहन?

G20 च्या बैठकीत आरोग्य मंत्र्यांशी संवाद साधताना त्यांनी हे आवाहन केलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : संपूर्ण जगानं गेल्या वर्षभरापूर्वी कोविडचा भीषण काळ पाहिला. यामध्ये जगभरातील करोडो लोक बाधित झाले होते तर लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. यापार्श्वभूमीवर भविष्यातील आरोग्य आणीबाणीसाठी आपल्याला तयार रहायला हवं, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

गुजरातच्या गांधीनगर इथं आयोजित जी २०च्या परिषदेत ते व्हिडिओ मेसेजद्वारे बोलत होते. (We must be ready to prevent prepare and respond to the next health emergency says PM Modi)

महात्मा गांधींचा केला उल्लेख

भारतातील २.१ मिलिअन डॉक्टर्स, ३.५ मिलियन नर्सेस, १.३ मिलियन नर्सेस, १.३ मिलियन पॅरामेडिक्स, १.६ मिलियन फार्मासिस्ट तसेच आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या इतर लाखो लोकांच्यावतीनं पंतप्रधानांनी जी २० परिषदेतील आरोग्य मंत्र्यांचं स्वागत केलं. (Latest Marathi News)

मोदी म्हणाले, महात्मा गांधींनी आरोग्य हा देशासाठी महत्वाचा विषय असल्याचं म्हटलं होतं. त्यासाठी त्यांनी की टू हेल्थ नावानं एक पुस्तकही लिहिलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, निरोगी असणं म्हणजे मन आणि शरीर सुसंवाद आणि समतोल स्थितीत असणे होय, म्हणजे आरोग्य हा जीवनाचा पाया आहे. यावेळी त्यांनी आरोग्यम् धनसंपदा या संस्कृत श्लोकचं देखील उल्लेख केला. (Marathi Tajya Batmya)

आरोग्य आणीबाणीसाठी तयार राहा

दरम्यान, पंतप्रधानांनी यावेळी कोविड १९चं स्मरण करताना म्हटलं की, आरोग्य हे आपल्या निर्णयांच्या केंद्रस्थानी असायला हवं. काळानं आपल्याला आंतरराष्ट्रीय सहकार्य शिकवलं आहे. यामध्ये प्रामुख्यानं औषधांचा आणि लशींचा पुरवठा किंवा आपल्या लोकांना देशात सुखरुप घेऊन येणं शिकवलं आहे.

महामारीच्या काळानं आपल्याला बरंच काही शिकवलं आहे. त्यामुळं ग्लोबल हेल्थ सिस्टिमनं लवचिक असणं गरेजचं आहे, असंही पंतप्रधान म्हणाले. त्यामुळं भविष्यातील आरोग्य आणीबाणीला प्रिव्हेंट, प्रिपेअर आणि रिस्पॉन्डसाठी तयार असलं पाहिजे असं आवाहन यावेळी पंतप्रधान मोदींनी केलं.

२०३० पर्यंत टीबी निर्मुलन करणार

सन २०३० पर्यंत टीबीचं भारतातून निर्मुलन करण्याचं टार्गेट निश्चित केल्याचंही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sand Mining Ban: राज्यात अवैध वाळू उपसा बंद करण्याचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका निकाली

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मध्ये आज बंजारा समाजाच्या वतीने एल्गार मोर्चा काढण्यात आला

Dasara 2025: कंबरेला दोरी बांधून ७७ वर्षीय पुजाऱ्याने ओढल्या बारा बैलगाड्या; बिरोबाचा पारंपारिक दसरा महोत्सव

Shivaji Maharaj Video: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील रिझर्व बँक पाहिली का? व्हिडिओ व्हायरल

Video: रावणाची दहा डोकी घेऊन फिरत होती राखी सावंत, अशाच अवतारात छम्मक छल्लो गाण्यावर नाच नाच नाचली, व्हिडिओ बघून तुम्ही पण हसाल

SCROLL FOR NEXT